शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! काय सांगता, ‘या’ गावातील लोक करतायेत सापांची शेती; जगभरात गाजतंय गावाचं नाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 5:09 PM

1 / 10
सध्या कोरोना व्हायरस पसरण्यामागे चीन जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. याठिकाणी लोक मोठ्या संख्येने मांसाहार करतात, त्यातूनच हा आजार पसरल्याचं सांगण्यात येतं.
2 / 10
तुम्ही भाजीपाला, फळांची शेती केली जाते हे ऐकलं असेल पण तुम्ही कधी अशा शेतीबद्दल ऐकलं आहे का? सापांची शेती केली जाते, ऐकून धक्का बसेल ना! पण हे खरं आहे.
3 / 10
चीनच्या एका गावात विषारी सापांची शेती केली जाते, या गावाचं नाव जिसिकियाओ असं आहे. याठिकाणी तब्बल ३० लाखपेक्षा जास्त सापांचे प्रकार आढळतात.
4 / 10
१ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सापांची शेती करण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. याठिकाणी प्रत्येक दुसरा व्यक्ती सापाच्या संगोपनाचं काम करतो.
5 / 10
या गावातील लोकांची मैत्री किंग कोब्रा आणि वायपरसारख्या सापांची आहे. सापांच्या शेतीसाठी जगभरात चीनमधील हे गाव प्रसिद्ध आहे. स्नेक फार्मिंग म्हणून याठिकाणी साप पाळले जातात.
6 / 10
जिसिकियाओमध्ये वेगवेगळ्या सापांच्या प्रजाती आणि त्यांचे संगोपन केले जाते, यात किंग कोब्रा, अजगर, विषारी वायपरसारखे अनेक साप असतात.
7 / 10
याठिकाणचे लोक सापांच्या अंगाला बाजारात विकून नफा कमवतात, चीनमध्ये सापांच्या मांसाला मोठी मागणी आहे. त्यामुळे या गावात सापांची शेती केली जाते. सापाचे विष विकूनही येथील लोक चांगली कमाई करतात.
8 / 10
हे विषारी साप गावकऱ्यांसाठी सामान्य आहेत, सापांचे मांस विकून ते आपला उदरनिर्वाह करतात, त्यासोबत साप हे त्यांच्यासाठी अन्न आहे.
9 / 10
या गावातील लोक फक्त फाइव स्टेप सापाला भीतात, कारण हा साप चावला तर पाच पावलांवर जाताच चावा घेतलेल्या त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.
10 / 10
चीनमध्ये सापांच्या मांसाला जास्त किंमत मिळते, त्यासाठी हे लोक सापांची शेती करुन पोट भरतात, ते सहजपणे विषारी सापांसोबत काम करताना दिसतात.
टॅग्स :chinaचीनsnakeसाप