पोट चिकटलेल्या जुळ्या भावंडांचं निधन; जगात सर्वात जास्त आयुष्य जगण्याचा रेकॉर्ड, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 05:38 PM2020-07-07T17:38:53+5:302020-07-07T17:52:35+5:30

जगातील सगळ्यात वयस्कर जुळ्या भावाचं निधन झालं आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी या दोन्ही भावांचा मृत्यू झाला आहे. रॉनी आणि डॉनी गेलयन यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९५१ मध्ये झाला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला आहे.

२०१४ मध्ये या दोन्ही जुळ्या भावंडांच्या नावावर ६३ वर्षांपर्यंत म्हणजेच जास्तीत जास्त वर्ष जीवंत राहण्याच्या रेकॉर्डची नोंद झाली होती. याआधी सुद्धा हा रेकॉर्ड अमेरिकेतील चेंग आणि एंग या जुळ्या भावंडानी केला होता. त्यांचे शरीर लहानपणापासून पोटाच्या भागात चिकटलेले होते.

रॉनी आणि डॉनी यांचा भाऊ जिम गेलयन याने दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी सगळ्यात जास्त वर्ष एकमेकांना चिकटलेल्या अवस्थेत जगणाऱ्या जुळ्यांचा रेकॉर्ड केला होता. हे दोघं भाऊ खूप उत्साहित असायचे. त्यांनी पाहिलेली स्वप्न नेहमी प्रत्यक्षात उतरवली.

पोट चिकटल्यामुळे दोघांच्या शरीरातील लोअर डायडेस्टिव्ह ट्रॅक्ट आणि मलाशय एकच होते. पण या दोघांचे हृदय आणि छाती वेगवेगळी होती.

त्यांचा भाऊ जीम आणि त्यांची पत्नी हे या दोघं भावडांची काळजी घ्यायचे. २०१४ मध्ये या दोघांनी कार्निवल साईड शोमध्ये सहभाग घेतला होता.

त्याठिकाणी हे भावंडं आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. यातून मिळवलेला पैसा त्यांना भाऊ बहिणीच्या शिक्षणासाठी खर्च केला.

१९९१ मध्ये या दोघांनी कुटुंबाशिवाय राहायला सुरूवात केली. तब्बल २० वर्षांनी आरोग्यासंबंधी समस्या उद्भवल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाच्या संपर्कात यावे लागल्याने ही भावंडं कुटंबासोबत राहू लागली.

Read in English