इथे तयार झालं जगातील सगळ्यात मोठं एअरपोर्ट, इतकं मोठं की पूर्ण मुंबई शहर सामावेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 15:26 IST2025-01-08T15:14:57+5:302025-01-08T15:26:54+5:30
World Biggest Airport: जगातील सगळ्यात मोठं एअरपोर्ट दुबईमध्ये बांधलं जात आहे. हे एअरपोर्ट इतकं भव्य आहे की, त्यात मुंबईसारखे काही शहर सामावू शकतील.

World Biggest Airport: दुबई आपल्या भव्यतेसाठी जगभरात ओळखलं जातं. येथील श्रीमंत शेख, गगनचुंबी इमारती, सोनं-चांदी आणि सुंदर-मोठाले रस्ते सगळ्यांनाच मोहीत करतात. आता या देशाच्या नावावर एक नवीन रेकॉर्ड नोंदवला जात आहे. जगातील सगळ्यात मोठं एअरपोर्ट दुबईमध्ये बांधलं जात आहे. हे एअरपोर्ट इतकं भव्य आहे की, त्यात मुंबईसारखे काही शहर सामावू शकतील.
UAE च्या दुबईमध्ये जगातील सगळ्यात मोठं एअरपोर्ट बनून तयार आहे. जगातील सगळ्यात मोठं एअरपोर्ट सौदी अरबच्या दम्माममध्ये आहे. अल मखतूम इंटरनॅशनल एअरपोर्ट जगातील सगळ्यात मोठं एअरपोर्ट आहे. ज्यात 400 टर्मिनल गेट असतील.
नवीन एअरपोर्ट दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टपेक्षा 5 पटीनं मोठं आहे. या एअरपोर्टवरून दरवर्षी 26 कोटी प्रवासी प्रवास करू शकतील. अल मखतूम इंटरनॅशनल एअरपोर्टवर 5 पॅरलल रनवे आहेत. जेथून एकाच वेळी 5 विमान टेकऑफ किंवा लॅंड करू शकतील.
हे एअरपोर्ट बनवण्यासाठी 35 अब्ज डॉलर म्हणजे 30,05,27,32,50,000 रूपये खर्च आला. UAE चे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मखतून यांनी दुबईच्या गरजा बघता हे तयार करण्याचे आदेश दिले होते.
या एअरपोर्टचा एकूण एरिया 70 स्क्वेअर किमी इतका आहे. हे तयार करण्यासाठी 10 वर्ष लागणार आहेत. हे एअरपोर्ट सुरू झाल्यानंतर दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं ऑपरेशनही याच एअरपोर्टमध्ये ट्रान्सफर केलं जाईल.
दुबईच्या या एअरपोर्टजवळ एक पूर्ण शहर वसवलं जाईल. यात १० लाख लोकांसाठी हाउिसंग प्रोजेक्टचं काम पूर्ण होईल. हे एअरपोर्ट सगळ्यात मोठं असण्यासोबतच सगळ्यात महागड्या एअरपोर्टपैकी एक असेल.
कोरोना काळात इथे विमान पार्क केले जात होते. ही जागा कोरोना काळात एमिरेट एअरलाइन्सच्या डबल-डेकर एअरबस A380 आणि इतरही विमान पार्क करण्याच्या कामी येत होती. तसेच इथे एअर शो केले जात होते.