शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

फक्त महिला राहत असलेल्या 'या' गावात पुरूषांवर आहे बंदी, पण तरीही येथील महिला होतात गर्भवती; पाहा कशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:41 IST

1 / 7
Interesting Facts : सामान्यपणे कोणत्याही महिलेसाठी गर्भधारणेची प्रक्रिया ही नॅचरली शरीर संबंध ही असते. अलिकडे आयव्हीएफ इत्यादी सुविधा आल्या आहेत. पण सामान्यपणे पुरूषासोबत शरीर संबंध ठेवल्यानंतरच महिला गर्भवती होते. पण आपल्याला वाचून आश्चर्च वाटेल की, जगात एक असंही गाव आहे जिथे पुरूषांना येण्यास बंदी आहे. तरीही या गावातील महिला गर्भवती होतात. आफ्रिकेतील याच अनोख्या गावाबाबत आपण जाणून घेणार आहोत.
2 / 7
साऊथ आफ्रिकेतील केनियाच्या उमोजा गावाची ही अनोखी कहाणी आहे. घनदाट जंगलांमध्ये वसलेल्या या महिलांच्या गावात पुरूषांना येण्यास बंदी आहे. १९९० मध्ये या गावात अशा महिलांनी राहण्याचा निर्णय घेतला होता ज्यांच्यावर ब्रिटीशांनी लैंगिक अत्याचार केले होते. आता या गावात अशाच अत्याचार झालेल्या, बाल विवाह झालेल्या, कौटुंबिक हिंसेच्या शिकार असलेल्या महिला राहतात. याच कारणामुळे या गावात पुरूषांना येण्यास बंदी आहे.
3 / 7
हे एक लहान गाव असलं तरी यात साधारण २५० महिला आपल्या मुलांसोबत राहतात. हे गाव तयार झालं तेव्हा केवळ इथे १५ महिला होत्या. या गावात राहणाऱ्या महिलांनीच त्यांच्या मुलांसाठी शाळा आणि कल्चरल सेंटर सुरू केलं आहे.
4 / 7
आश्चर्याची बाब म्हणजे या गावामध्ये पुरूषांना बंदी असूनही येथील महिला गर्भवती होतात. यामागचं रहस्य हे आहे की, इथे राहणाऱ्या काही महिलांचं शेजारच्या गावातील काही पुरूषांसोबत अफेअर असतं. महिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी रात्रीच्या अंधारात गावाबाहेर जातात. आपल्या आवडीच्या पुरूषासोबत त्या संबंध ठेवतात. त्यामुळे महिला गर्भवती होतात. या महिला तोपर्यंत या पुरूषांच्या संपर्कात राहतात जोपर्यंत त्या गर्भवती होत नाहीत.
5 / 7
महिला गर्भवती झाल्यावर त्या पुरूषासोबत सगळे संबंध तोडते. त्यानंतर बाळाचा जन्म होतो. महिला एकटीच बाळाचा सांभाळ करते. ती एकटीच मेहनत करून पैसे कमावते आणि आपलं व आपल्या बाळाचा सांभाळ करते.
6 / 7
महिला आपल्या मुलांना कधीच सांगत नाहीत की, त्यांचे वडील कोण आहेत. उमोजा गावात बाल विवाह, कौटुंबिक हिंसा आणि बलात्कार पीडित महिला राहतात. समबुरूच्या गवताच्या मैदानाच्या मधोमध वसलेल्या या गावात राहणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी इथे शाळाही उघडण्यात आली आहे.
7 / 7
आता वेगवेगळ्या देशातील लोक हे अनोखं गाव बघण्यासाठी येतात. महिला पर्यटकांना सामबुरू नॅशनल पार्क फिरवण्याचं त्या कामही करतात. पर्यटकांकडून पैसेही घेतले जातात. या पैशातून महिला आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करतात.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके