'वजनदार' बदला; त्यानं तिला फसवलं, तिनं असं काही 'करून दाखवलं' की...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 01:10 PM2020-02-27T13:10:50+5:302020-02-27T13:40:01+5:30

Jen सध्या एका दुसऱ्या व्यक्तीसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. पण तिने जाडेपणावरून झालेल्या अपमानाचा चांगलाच बदला घेतला. ती आता Miss Great Britain किताबाची मानकरी ठरली आहे.

Jen Atkin या महिलेला तीन वर्षांआधी तिच्या होणाऱ्या नवऱ्याने सोडलं होतं कारण ती फार जाड होती आणि ती फार जास्त फास्ट फूड खात होती.

ही गोष्ट तिच्या मनाला फार चटका लावून गेली. त्यानंतर आता तिच्यात इतका बदल झाला की, तिला ओळखणंही कठिण झालं आहे.

Jen सध्या एका दुसऱ्या व्यक्तीसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. पण तिने जाडेपणावरून झालेल्या अपमानाचा चांगलाच बदला घेतला. ती आता Miss Great Britain किताबाची मानकरी ठरली आहे.

Ulceby मध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय एव्हीएशन अॅडमिस्ट्रेशनने दोन वर्षात स्वत:त असा काही बदल केला की, आता तिच्याकडे बघणारे बघत राहतात. यासाठी तिने दोन वर्ष हेल्दी डाएट आणि एक्सरसाइज केली आणि ती आता २२ साइजवरून १० साइज झालीये.

जेन ही आधी Miss Scunthorpe ची मानकरी ठरली होती. नंतर ती २०१८ Miss England होण्याच्या स्पर्धेत उतरली. त्यावेळी ती रनर-अप ठरली होती. नंतर काही वेळ तिने सौंदर्य स्पर्धांमधून ब्रेक घेतला. पुन्हा दणक्यात एन्ट्री घेतली आणि यावेळी ती 75th Miss Great Britain स्पर्धेत विजयी ठरली.

गेल्या आठवड्यात झालेल्या स्पर्धेत ती विजयी ठरली आणि तिला Miss Great Britain हा किताब देण्यात आला. (Image Credit : dailymercury.com.au)

या विजयानंतर ती म्हणाली की, 'माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की, मी जिंकलेय. जेव्हा मी या सगळ्याची सुरूवात केली होती तेव्हा हे सगळं केवळ सहज करत होते. मी इतक्या दूर येईन याची मी कल्पनाही केली नव्हती. तीन वर्षांआधी मी याचा विचारही करू शकत नव्हते. मात्र, मेहनत नेहमी कामात येते'. (Image Credit : dailymercury.com.au)

ती पुढे म्हणाली की, 'Miss Great Britain चा किताब जिंकणं हे फार अवघड काम आहे. पण हा प्रवास थक्क करणारा होता. माझं शरीर आता खूप बदललं आहे. आधी माझं शरीर असं नव्हतं. परिक्षकांनी माझं शरीर नाही तर मी व्यक्ती म्हणून काय आहे हे बघितलं'.

ब्रेकअपबाबत सांगताना ती म्हणाली की, 'माझं ब्रेकअप होण्यापूर्वी मी खूप जास्त पास्ता किंवा पिझ्झा खात होते. पण ज्या दिवशी तो माझ्या आयुष्यातून गेला मी एकटे झाले. तब्बल आठवडाभर मी रडत होते आणि खूपकाही खात होते. पण आता त्या घटनेमुळेच सगळं काही ठिक झालं आहे'.

तो तिच्या आयुष्यातून गेल्यावर तिने वर्कआउट आणि डाएट करणं सुरू केलंय. तेव्हापासून तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज तिने स्वत:त बदल करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

(Image Credit : DailyMail)

(Image Credit : DailyMail)

(Image Credit : DailyMail)

Image Credit : DailyMail)

Image Credit : DailyMail)