पिझ्झाला 'मार्गरीटा' का म्हटलं जातं? खाल्ला तर असेल पण याचं उत्तर माहीत नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:11 IST2025-03-03T12:54:12+5:302025-03-03T13:11:48+5:30

Pizza History : तुम्हीही पिझ्झा अनेकदा खाल्ला असेल तर पिझ्झाला मार्गरीटा पिझ्झा (Margherita Pizza) हे नाव कसं पडलं हे माहीत आहे का?

Pizza History : जगभरात पिझ्झा आज सगळ्यात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. लोक नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टी पिझ्झा खातात. त्यामुळेच डॉमिनोज, पिझ्झा हट सारखी फूड चेन वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा बनवतात. तुम्हीही पिझ्झा अनेकदा खाल्ला असेल तर पिझ्झाला मार्गरीटा पिझ्झा (Margherita Pizza) हे नाव कसं पडलं हे माहीत आहे का? नसेल तर आता जाणून घेऊ.

पिझ्झाला मार्गरीटा पिझ्झा म्हटलं जातं कारण हा पिझ्झा इटलीची राणी मार्गरीटाच्या सन्मानात बनवण्यात आला होता. असं सांगितलं जातं की, १८८९ मध्ये जेव्हा क्वीन मार्गरीटानं नेपल्सचा दौरा केला होता. तेव्हा तिच्यासाठी एक खास पिझ्झा तयार करण्यात आला होता. या पिझ्झामध्ये टोमॅटो, मोजेरेला चीज आणि बेसिलचा वापर करण्यात आला होता. ज्यात इटलीच्या ध्वजातील तीन रंग लाल, पांढरा आणि हिरवा होता. राणीला हा पिझ्झा इतका आवडला की, त्यांना त्याचं नाव मार्गरीटा पिझ्झा ठेवलं.

तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण पूर्वी पिझ्झा श्रीमंतांसाठी नाही तर गरीब लोकांसाठी बनवला जात होता. सुरूवातीला पिझ्झा शिळे ब्रेड आणि शिल्लक राहिलेल्या भाजीपासून बनवला जात होता. जेणेकरून अन्न वाया जाऊ नये. कालांतरानं हा लोकप्रिय डिश बनला.

इन्स्टाग्राम यूजर अनुज मोहंतीनं अलिकडेच एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात त्यानं पिझ्झाच्या रोमांचक इतिहासाबाबत सांगितलं. पिझ्झाची सुरूवात १८व्या शतकात इटलीच्या नेपल्स शहरात झाली होती. त्यावेळी नेपल्समध्ये कामाच्या शोधात आलेले गरीब लोक चांगलं जेवण खरेदी करण्यास सक्षम नव्हते. अशात एका अशा डिशची गरज होती, जी स्वस्त, टिकाऊ आणि लगेच तयार होईल.

त्यावेळी पिझ्झामध्ये आतासारखं मोजेरेला चीज, सॉसेज किंवा पनीर राहत नव्हतं. तर यात शिल्लक राहिलेला ब्रेड, टोमॅटो, तेल आणि सीजनिंग टाकून बनवला जात होता. हळूहळू लोकांना याची टेस्ट आवडली आणि नंतर पूर्ण यूरोपमध्ये फेमस झाला. १८८९ मध्ये राणी मार्गरीटाच्या सन्मानात 'पिझ्झा मार्गरीटा' बनवण्यात आला. ज्यात इटलीच्या ध्वजाचे रंगही दर्शवण्यात आले आहेत.

आधी पिझ्झाला श्रीमंत लोक बेकार जेवण मानत होते. कारण तो गरीबांसाठी बनवण्यात आला होता. पण जेव्हा राणी नेपल्सला आली तेव्हा त्यांनी पिझ्झाची टेस्ट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. फेमस शेफ राफेल एसपोसीटोनं त्यांच्यासाठी एक खास पिझ्झा बनवला होता. हा पिझ्झा राणीला खूप आवडला आणि त्यांनी याचं नाव मार्गरीटा पिझ्झा ठेवलं.

नंतर २०व्या शतकात इटलीतील जेव्हा अमेरिकेत काम करण्यासाठी आले, तेव्हा पिझ्झाची रेसिपी सोबत घेऊन आले. येथील लोकांना सुद्धा पिझ्झा आवडला. १९५८ मध्ये पिझ्झा हट आणि १९६० मध्ये डॉमिनोजची सुरूवात झाली. बघता बघता पिझ्झा जगभरात फेमस झाला.