एक असाही देश जिथे नाही एकही डास, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:13 IST2024-12-23T15:56:31+5:302024-12-23T16:13:35+5:30

लोक डास पळवून लावण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. मात्र, जगात एक असाही देश आहे जिथे एकही डास नाही.

Mosquito Free Country Iceland: जगभरा दरवर्षी हजारो लोकांचा जीव डासांच्या चावण्यामुळे झालेल्या आजारांमुळे होतो. काही देशांमध्ये तर जीव जाण्याचं मुख्य कारण डासांच्या चावल्याने झालेला आजार हेच आहे. अशात लोक डास पळवून लावण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. मात्र, जगात एक असाही देश आहे जिथे एकही डास नाही.

आता तुम्हालाही विचार पडला असेल की, जगात असा कोणता देश आहे जिथे एकही डास नाही? हा देश आहे आइसलॅंड आणि आइसलॅंडमध्ये तुम्ही डास मारू शकत नाही. कारण इथे डासच नाहीत.

उत्तर अटलांटिक महासागरमध्ये स्थित आइसलॅंड देश असा आहे, जिथे एकही डास नाही. इतकंच नाही तर या देशात डासांसोबतच इतरही अनेक जीव नाहीत. जे सामान्यपणे जगाच्या कानाकोपऱ्यात असतात. आइसलॅंडमध्ये साधारण १३०० प्रकारचे जीव आहेत. तसेच येथील लोकसंख्याही कमी आहे.

कमालीची बाब ही आहे की, आइसलॅंडचे शेजारील देश ग्रीनलॅंड, स्कॉटलॅंड आणि डेन्मार्क इत्यादींमध्ये डास भरपूर आहेत. अशात ही विचार करण्यासारखी बाब आहे की, आइसलॅंडमध्ये डास का नाहीत?

डासांबाबत सांगितलं जातं की, ते साचलेल्या पाण्यात वाढतात. यात त्यांची अंडी लार्वामध्ये बदलतात. यासाठी त्यांना एका योग्य तापमानाची गरज असते. आइसलॅंडची स्थिती अशीच आहे की, साचलेलं पाणी इथे जास्त वेळ राहत नाही. सोबतच लोकसंख्या कमी असल्याने घरांमध्येही डासांसाठी अनुकल अशी स्थिती नसते. त्यामुळे इथे डास वाढू शकत नाहीत.

असंही म्हटलं जातं की, आइसलॅंडमध्ये तापमान फार कमी असतं. इथे -३८ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान खाली येतं. त्यामुळे इथे डास वाढणं किंवा राहणं अशक्य आहे. मात्र, इथे एक डासासारखा दिसणारा जीव असतो. पण तो डास नाही.

डासच नाही तर आइसलॅंडमध्ये सापासारखे इतर सरपटणारे जीव किंवा कीटकही नसतात. या जीवांसाठी देखील इथे जलवायु आणि तापमान अनुकूल नाही. त्यामुळे या जीवांचं आइसलॅंडवर अस्तित्व नाही. त्यामुळे या देशाचं नाव स्नेक फ्री देशात येतं.