By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:34 IST
1 / 6Bangladesh Railway Track Facts : भारतात जगातील चौथं सगळ्यात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. भारतात जास्तीत जास्त लोक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. कारण हा प्रवास आरामदायक आणि स्वस्त असतो. आपणही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. तेव्हा पाहिलं असेल की, सगळ्याच रेल्वे दोन ट्रॅकवर धावतात. पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, एक असा देश आहे जिथे रेल्वे दोन नाही तर तीन ट्रॅकवर धावतात. पण असं का? तेच जाणून घेऊया. 2 / 6भारतात नाही, पण जगातील काही देशांमध्ये रेल्वेसाठी अशाप्रकारे तीन ट्रॅक बघायला मिळतात. त्यातीलच एक देश म्हणजे बांगलादेश. इथे रेल्वे तीन ट्रॅकवर धावतात. 3 / 6कारण बांगलादेशमध्ये आधी मीटर गेज रेल्वे लाइन होती. पण नंतर जेव्हा त्यांना ब्रॉड गेज रेल्वेची गरज पडली तेव्हा, पूर्ण लाइन हटवून नवीन लाइन बसवणं खूप अवघड होतं. खर्च खूप जास्त येणार होता. त्यामुळे तिथे एक एक्स्ट्रा ट्रॅक लावण्यात आला. यामुळे एका रेल्वे ट्रॅकवर मीटर आणि ब्रॉड गेज दोन्ही प्रकारचे ट्रॅक झाले. 4 / 6बांगलादेशात ऐतिहासिक कारणांमुळे ब्रॉड गेज आणि मीटर गेज दोन्ही रेल्वे लाईन्स अस्तित्वात आहेत. ब्रिटिश काळात काही भागात मीटर गेज, तर काही भागात ब्रॉड गेज टाकले गेले. नंतर संपूर्ण नेटवर्क बदलणे महाग आणि वेळखाऊ ठरले. म्हणून एक ड्युअल गेज सिस्टीम वापरण्यात आली.5 / 6तेच भारतात चार प्रकारच्या गेजचा वापर केला जातो. ब्रॉड गेज, मीटर गेज, नॅरो गेज आणि स्टॅंडर्ड गेज. प्रत्येक रेल्वे ट्रॅक गेजच्या हिशेबाने बनवला जातो. गेजचा अर्थ होतो दोन ट्रॅकमधील अंतर. जगातील साधारण ६० टक्के देशांमध्ये स्टॅंडर्ड गेजचा वापर केला जातो. 6 / 6बाहेरचे दोन रुळ - ब्रॉड गेज ट्रेनसाठी, एक बाहेरचा + मधला रुळ - मीटर गेज ट्रेनसाठी, म्हणजेच एकाच ट्रॅकवर दोन वेगवेगळ्या गेजच्या गाड्या धावू शकतात.