शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

आपली कामं सोपी करणाऱ्या QR कोडचा शोध नेमका लावला तरी कुणी? रोज वापरता पण माहीत नसेल नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 13:45 IST

1 / 8
QR Code Invention Story : पैशांचे कोणतेही व्यवहार आता डिजिटल झाल्यामुळे बरीच कामं सोपी झाली आहे. बाहेर पडताना खिशात पैसे असायलाच हवे असं काही नाही. भाजीवाला असो, एखादी टपरी असो, रिक्षा-कॅब-बस असो किंवा एखादं शोरूम असो कुठेही पैसे देण्याचं काम असेल तर QR चा वापर केला जातो. QR कोड लगेच स्कॅन करून समोरच्या व्यक्तीला पैसे देता येतात. इतकंच नाही तर हे बारीक काळ्या-पांढऱ्या रंगाचे चौकोणी कोड माहिती मिळवण्यासाठी आणि कामे वेगानं करण्यासाठी देखील मदत करतात. आपणही अनेकदा QR कोडचा वापर केला असेलच. पण ज्या QR कोडने आपलं काम इतरं सोपं केलं त्याचा शोध कुणी लावला हे अनेकांना माहीत नसेल. याच व्यक्तीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 8
ज्या QR कोडचा आपण रोज वापर करतो त्याचा शोध मासाहिरो हारा नावाच्या व्यक्तीने लावला. मासाहिरो हारा एक जपानी इंजिनिअर आहेत, ज्यानी QR कोडचा आविष्कार केला. त्याच्या या आविष्कारानं केवळ बिझनेसच नाही तर जगातील लोकांच्या टेक्नॉलॉजी वापरण्याच्या पद्धतीतही बदल झाला आहे.
3 / 8
माराहिरो हारा यांचा जन्म १९५७ मध्ये टोकियोमध्ये झाला होता. बालपणी त्याला पझल्स सॉल्व करणं आणि वस्तूंच्या काम करण्याच्या पद्धती अशा बारीक-बारीक गोष्टी समजून घेण्याची खूप आवड होती. त्यानी जपानच्या प्रसिद्ध टोकिया यूनिव्हर्सिटी ऑफ सायन्समधून शिक्षण घेतलं आणि इंजिनिअरींगमध्ये कौशल्य मिळवलं.
4 / 8
मासाहिरो हारा यांनी डेन्सो कॉर्पोरेशनमध्ये काम सुरू केलं, ही कार पार्ट्स तयार करणारी कंपनी आहे. इथे तो बारकोड स्कॅनिंग सिस्टीमवर काम करत होता, जेणेकरून कार बनवण्याची प्रक्रिया सोपी व्हावी. पण जुन्या बारकोडमध्ये समस्या होत्या, त्यामुळे ते माहिती कमी ठेवू शकत होते. स्कॅन करण्यासाठी योग्य दिशा असणं गरजेचं होतं.
5 / 8
मासाहिरोला वाटलं की, यापेक्षा चांगली पद्धत असली पाहिजे. यासाठी त्याला प्रेरणा मिळाली जपानी बोर्ड गेम “गो” मधून, ज्यात काळ्या-पांढऱ्या तुकड्यांना चौकोणी ग्रिडवर ठेवलं जातं. यातून त्याला दोन पद्धतीचा कोड बनवण्याची आयडिया मिळाली. १९९४ मध्ये आपल्या टीमसोबत अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर हारानं QR कोड बनवला.
6 / 8
आताचा QR कोड जुन्या बारकोडपेक्षा खूप वेगळा आहे. हा जास्त माहिती जसे की, अक्षर आणि नंबर स्टोर करू शकतो. तसेच वेगानं स्कॅन करता येतो. आधी याचा वापर फॅक्टरीमध्ये कार पार्ट्स ट्रॅक करण्यासाठी केला जात होता.
7 / 8
मात्र, नंतर याचा वापर दुकानं, हॉस्पिटल, ट्रान्सपोर्ट आणि मनोरंजनासाठीही होऊ लागला. जेन्सो वेव हारा कंपनीनं QR कोड फ्रीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आणि याचं पेटंट केलं नाही. ज्यामुळे जगभरातील डेव्हलपर्स आणि उद्योजकांनी याचा फ्रीमध्ये वापर केला आणि आपल्या पद्धतीनं QR कोड आणखी विकसित केला.
8 / 8
धक्कादायक बाब म्हणजे मासाहिरो हारा आणि त्यांच्या टीमला या आविष्काराचा एक पैसाही मिळाला नाही. कारण त्यांचा उद्देश केवळ याला सगळ्यांच्या उपयोगासाठी बनवण्याचा होता. आज QR कोड कॅशलेस पेमेंट आणि फेक साहित्य रोखण्याच्या कामातही याचा वापर केला जातो.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके