अरे बाप! भारतातील सगळ्यात लांब नाव असलेलं रेल्वे स्टेशन, नावात आहेत तब्बल ५७ अक्षरं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 13:28 IST2024-12-26T12:44:10+5:302024-12-26T13:28:27+5:30

तुम्हालाही माहीत असतील. पण तुम्हाला माहीत आहे का की, असं कोणतं रेल्वे स्टेशन आहे ज्याच्या नावात तब्बल ५७ अक्षरं आहेत.

भारतीय रेल्वे जगातील जगातील चौथ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं आहे. रेल्वे भारताची लाइफलाईन म्हटली जाते. कारण रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत आपापल्या ठिकाण्यावर पोहोचतात. रोज भारतात साधारण ११ हजार रेल्वे धावतात. सध्या देशात साधारण ७, ३३५ रेल्वे स्टेशन्स आहेत. ज्यांची काही नावे तुम्हालाही माहीत असतील. पण तुम्हाला माहीत आहे का की, असं कोणतं रेल्वे स्टेशन आहे ज्याच्या नावात तब्बल ५७ अक्षरं आहेत.

कोणत्याही रेल्वे स्टेशनचं नाव त्या शहराच्या किंवा स्थानाशी संबंधित असतं. पण भारतात एक असं रेल्वे स्टेशन आहे, ज्याचं नाव सगळ्यात मोठं आहे. पण अनेकांना ते माहीत नाही. नावात ५७ अक्षरं असल्यानं हे स्टेशन वेगळं ठरतं.

Southern Railway ने आपल्या अधिकृत X अकाऊंटवर तामिळनाडूच्या पुराच्ची थलायवर डॉ. एम.जी. रामचंद्रन सेंट्रल रेल्वे स्टेशनची माहिती शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनचं नाव भारतात सगळ्यात मोठं आहे. ज्यात ५७ अक्षरं आहेत.

चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनचं नाव भारतात सगळ्यात मोठं आहे. या स्टेशनचं नवीन नाव पुराच्ची थलायवर डॉ. एम.जी. रामचंद्रन सेंट्रल रेल्वे स्टेशन आहे.

या स्टेशनला आधी मद्रास सेंट्रल रेल्वे नावाने ओळखलं जात होतं. नंतर ते चेन्नई सेंट्रल नावाने ओळखलं जात होतं. नंतर २०१९ मध्ये हे नाव बदलून 'पुराच्ची थलायवर डॉ. एम.जी. रामचंद्रन सेंट्रल रेल्वे स्टेशन' करण्यात आलं.

एका मीडिया रिपोर्टनुसार, हा बदल तामिळनाडूच्या एआयएडीएमके सरकारच्या शिफारशीवर केंद्र सरकार द्वारे माजी मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन यांच्या सन्मानासाठी करण्यात आला. चेन्नई तामिळनाडू राज्याची राजधानी आहे आणि दक्षिण रेल्वे झोनचं मुख्यालय आहे.

त्याशिवाय हे स्टेशन चेन्नईला भारताच्या उत्तर भागांशी जोडतं जसे की, कोलकाता, मुंबई, दिल्ली आणि इतर शहरं. हे स्टेशन दक्षिण भारतातील सगळ्यात व्यस्त स्टेशनपैकी एक आहे.

दरम्यान, वेल्समध्ये “Llanfairpwllgwyngyllgogerychwyrndrobwllllantysiliogogogoch” रेल्वे स्टेशनचं नाव जगात सगळ्यात मोठं नाव आहे. हे यूरोप आणि जगातील सगळ्यात मोठं नाव असलेलं स्टेशन आहे. ज्यात ५८ अक्षरं आहे.