भारतातील सगळ्यात छोटं नाव असलेलं रेल्वे स्टेशन कोणतं? तुम्हालाही नसेल माहीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:14 IST2025-02-28T12:54:52+5:302025-02-28T13:14:36+5:30
Shortest Railway Station Name : रेल्वेबाबत अशा अनेक गोष्टी असतात ज्या लोकांना माहीत नसतात किंवा त्या जाणून घेण्याची उत्सुकता असते.

Which Is shortest named railway station In India: भारतातील रेल्वे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेचा विषय ठरत असतात. भारतीय रेल्वे सेवा जगातील सगळ्यात मोठ्या सेवांपैकी एक आहे. लाखो लोक रोज रेल्वेनं प्रवास करत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. आज देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे सेवा पोहोचली आहे. रेल्वेबाबत अशा अनेक गोष्टी असतात ज्या लोकांना माहीत नसतात किंवा त्या जाणून घेण्याची उत्सुकता असते. अशीच एक बाब म्हणजे भारतातील कोणत्या रेल्वे स्टेशनचं नाव सगळ्यात लहान आहे.
रेल्वेनं प्रवास करण्याचा अनुभव खूप आनंद देणारा, आरामदायक आणि स्वस्त असतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोक रेल्वेनं प्रवास करतात.
रेल्वेनं प्रवास करत असताना मधे वेगवेगळे स्टेशन लागतात. काही स्टेशनवर रेल्वे थांबते तर काहींवर थांबत नाही. नवनवीन स्टेशनची नावे माहीत होतात. अनेकांना स्टेशनची नावं पाठ करण्याचा छंदही असतो. अशात देशातील कोणत्या स्टेशन नाव सगळ्यात लहान आहे हे जाणून घेऊया.
ज्या लोकांना भारतातील सगळ्यात छोटं रेल्वे स्टेशनचं नाव माहीत नसेल त्यांना वाचून आश्चर्य वाटेल. कारण देशातील सगळ्यात छोटं रेल्वे स्टेशनचं नाव केवळ दोन अक्षरांचं आहे.
भारतातील सगळ्यात छोटं नाव असलेलं रेल्वे स्टेशन ओडिशामध्ये आहे आणि या स्टेशनचं नाव ईब आहे. या स्टेशनचं नाव इंग्रजीमध्ये IB असं लिहितात.
ओडिशामधून वाहणाऱ्या महानदीच्या अनेक उपनद्या आहेत. यातील एक उपनदी ईब नदी आहे. या नदीच्या नावावरच या रेल्वे स्टेशनला नाव देण्यात आलं. या नावामुळे हे स्टेशन देशातील इतर स्टेशनपेक्षा वेगळं ठरतं.
ओडिशाच्या झारसुगुडा जिल्ह्यातील हे स्टेशन भारतीय रेल्वेच्या बिसालपूर डिव्हिजनचा भाग आहे. या स्टेशनवर दोन मुख्य प्लॅटफॉर्म आहेत. १८९१ पासून हे स्टेश कार्यरत आहे. याचा अर्थ हे स्टेशन १३४ वर्षापेक्षाही जुनं आहे.