कोणत्या देशांमध्ये असतात जगातील सगळ्यात सुंदर महिला? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 15:33 IST2025-02-28T15:15:47+5:302025-02-28T15:33:03+5:30
Beautiful Women : यूरोपीय संघटनेनं याबाबत एक सर्व्हे केला असून त्यात जगातील सगळ्यात सुंदर महिला असणाऱ्या काही देशांची नावं सांगण्यात आली आहे.

Beautiful Women : जगातील सगळ्यात सुंदर महिला कुठे असतात? या गोष्टीची चर्चा नेहमीच होत असते. प्रत्येकांचे याबाबत आपापले वेगळे विचार असतात. मात्र, यूरोपीय संघटनेनं याबाबत एक सर्व्हे केला असून त्यात जगातील सगळ्यात सुंदर महिला असणाऱ्या काही देशांची नावं सांगण्यात आली आहे. येथील महिला त्यांच्या नॅचरल सौंदर्यासाठी आणि आकर्षक व्यक्तित्वासाठी फेमस असतात.
यूरोपीय संघटनेद्वारे करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार, जगातील सगळ्यात सुंदर महिला यूक्रेनमध्ये आढळतात. येथील महिलांचं नॅचरल सौंदर्य नजरेत भरणारं असतं. तसेच त्यांचा नाजूकपणा आणि आकर्षक व्यक्तिमत्वही चर्चेत असतं.
यूक्रेननंतर जगातील सगळ्यात सुंदर महिला स्वीडन या देशात आढळतात. येथील महिलांचे निळे डोळे, सोनेरी केस आणि टोन्ड फिगर आकर्षक असते.
त्याशिवाय पोलॅंड, नॉर्वे, बेलारूस आणि रशियातील महिला सुद्धा आपल्या सौंदर्यासाठी फेमस आहेत. या देशांमधील महिला उंच असतात आणि त्यांच्या चेहऱ्याची बनावट प्रभावी असते.
मध्य यूरोपबाबत सांगायचं तर फ्रान्स आणि जर्मनीच्या महिला आपल्या नाजूकपणासाठी आणि उत्तर फीचर्ससाठी ओळखल्या जातात. येथील महिलांचे डोळे आणि केसांच्या रंगाची विविधता त्यांनी आणखी आकर्षक बनवतात.