शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जगातील सगळ्यात शेवटचं शहर, पुढे गेलात तर परत येण्याची नाही काही गॅरंटी...बघा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 12:45 IST

1 / 8
Unknwon Fact : पृथ्वीचा शेवट कुठे होतो? असा प्रश्न अनेकांना पडत असेल, पण बऱ्याच लोकांना याचं उत्तर माहीत नसतं. म्हणजे एक असं ठिकाण जिथे जमीन अचानक संपते आणि समोर फक्त समुद्र आणि बर्फच बर्फ दिसेल. आज आम्ही आपल्याला एका अशा ठिकाणाबाबत सांगणार आहोत, ज्याला पृथ्वीवरील शेवटचं शहर मानलं जातं.
2 / 8
हे शहर अर्जेंटिनामधील हे शहर इतकं दूर आणि वेगळं आहे की, इथे पोहोचल्यावर वेगळ्याच विश्वास पाउल ठेवल्याचा अनुभव येतो. या शहरापुढे फक्त शांतता आणि अंटार्कटिकाच्या गार वाऱ्याचं रहस्य आहे.
3 / 8
अर्जेंटिनाच्या दक्षिण भागात वसलेलं उशुआइया हे ठिकाण आपल्या खास भौगोलिक स्थितीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हे टिएरा डेल फ्यूगो राज्याची राजधानी आहे आणि हे जगातील सगळ्यात शेवटचं शहर आहे.
4 / 8
दक्षिण अमेरिकेचा अंत इथे होतो. त्यामुळे याला फिन डेल मुंडो म्हणजे जगाचा शेवटचा कोपरा म्हटलं जातं. पर्यटकांना इथे आपल्यावर एका वेगळ्या जगात आल्याचा अनुभव होतो. कारण इथून पुढे मनुष्यांच्या वस्ती संपतात आणि पुढे फक्त शांत द्वीप दिसतात.
5 / 8
उशुआइयाची खासियत म्हणजे इथून अंटार्कटिका महाद्विपाचं अंतर जवळपास १ हजार किलोमीटर इतकंच राहतं. हेच कारण आहे की, या शहरात अंटार्कटिकाचं प्रवेश द्वारही म्हटलं जातं. इथून पुढे मनुष्य वस्ती संपतात आणि सुरू होते एक भयाण शांतता.
6 / 8
उशुआइया अर्जेंटिनाचा भाग असल्याने येथील अधिकृत भाषा स्पॅनिश आहे. जगातील सगळ्यात शेवटचं शहर बघण्यासाठी इथे वर्षभर पर्यटक येत असतात. त्यामुळे इथे हॉटेल्स, मार्केट आणि पर्यटन स्थळांवर इंग्रजी सुद्धा बोलली जाते.
7 / 8
येथील नागमोडी वळणाचे रस्ते, रंगीबेरंगी घरे आणि समोर पसरलेल्या विशाल अशा समुद्राचा नजारा कधीही न विसरता येणार असा आहे. येथील वातावरण फारच थंड आणि आव्हानात्मक असतं. पण तरी सुद्धा जगातील शेवटच्या शहरात उभं राहून समुद्र बघणं एक वेगळाच अनुभव ठरतो.
8 / 8
ज्या लोकांना गर्दीतून दूर जाऊन निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल, कधीही न विसरता येणारा अनुभव घ्यायचा असेल त्यांच्यासाठी उशुआइया हे ठिकाण परफेक्ट ठरेल. हे एक असं ठिकाण आहे जिथे खरंच जमिनीचा शेवट जाणवतो.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके