शरीरातील कोणत्या अवयवाला अजिबात येत नाही घाम? कधी लक्षच दिलं नसेल, आता पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 15:24 IST2025-08-29T15:05:14+5:302025-08-29T15:24:00+5:30

Sweating Secrete : आपण कधी लक्ष दिलं नसेल की, शरीरातील एक असाही भाग आहे, जिथे कधीच घाम येत नाही.

Sweat Glands in Body: शरीराचं तापमान वाढलं की, आपोआप घाम येतो. ही एक नॅचरल प्रोसेस असून याद्वारे शरीर स्वत:ला थंड ठेवत असतं. शरीराच्या वेगवेगळ्या भागात घाम येतो. पण असा भाग आहे, जिथे घाम कधीच येत नाही.

शरीरातून घाम येणं ही एक सामान्य बाब आहे. त्यामुळेच आपण कधी लक्ष दिलं नसेल की, शरीरातील एक असाही भाग आहे, जिथे कधीच घाम येत नाही.

शरीराचं तापमान जेव्हा वाढतं, तेव्हा शरीरातून घाम निघतो. शरीरात सगळीकडे घाम येतो. घाम निघाल्यावर शरीराचं तापमान कमी सामान्य होतं.

आपल्या शरीरात अ‍ॅपोग्रीन नावाच्या ग्रंथी असतात, ज्यामुळे घाम तयार होतो. इथेच बॅक्टेरियाही तयार होतात आणि ज्यामुळे घामाची दुर्गंधी येते.

शरीरावर सगळीकडे घाम घेतो. पण एक असाही भाग आहे जिथे घाम येत नाही. कारण त्या भागात अॅपोग्रीन ग्रंथी म्हणजेच स्वेट ग्लॅंड नसतात.

शरीरावरील हा भाग म्हणजे आपले सुंदर, मुलायम आणि गुलाबी ओठ. हा शरीरातील एकमेव असा भाग आहे, जिथे उन्हाळ्यातही घाम येत नाही.

ओठांवर घाम न येण्याचं मुख्य कारण म्हणजे इथे स्वेट ग्लॅंड नसतात. याच कारणामुळे हिवाळ्यात ओठ फाटतात आणि उलतात.