रेल्वे ट्रॅकवर W/L असं लिहिलेला बोर्ड का असतो? पाहा काय होतो यांचा अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:43 IST2025-12-19T15:22:09+5:302025-12-19T15:43:34+5:30
Railway Interesting Facts : आपणही कधीना कधी रेल्वेने प्रवास करतेवेळी रूळाच्या बाजूला लावलेल्या बोर्ड्सवर W/L आणि सी/फा लिहिलेलं वाचलं असेल. पण याचा अर्थ काय?

रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. पण तरीही रेल्वेबाबत अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या लोकांना माहीत नसतात. रेल्वेने करताना तुम्ही अनेकदा स्टेशनवर किंवा रेल्वेच्या डब्यांवर वेगवेगळे कोड्स पाहिले असतील.

या सगळ्या कोड्सना किंवा बोर्डवरील चिन्हांना काहीना काही अर्थ असतो. पण ते क्वचितच लोकांना माहीत असतात. रेल्वेची बरीच कामे अशा कोड्सच्या माध्यमातून चालतात. आज अशाच एका कोडबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आपणही कधीना कधी रेल्वेने प्रवास करतेवेळी रूळाच्या बाजूला लावलेल्या बोर्ड्सवर W/L आणि सी/फा लिहिलेलं वाचलं असेल. आज आपण याच कोडचा अर्थ काय हे समजून घेणार आहोत.

रेल्वेमध्ये बरीचशी कामे संकेतांच्या माध्यमातून होतात. त्यामुळेच अनेक ठिकाणी साइन बोर्ड्स लावलेले असतात. यात बरीच महत्वाची माहिती दडलेली असते. असाच एक साइन बोर्ड म्हणजे W/L आणि सी/फा.

पिवळ्या रंगाचे हे बोर्ड सहजपणे तुम्ही बघू शकता. यातील W चा अर्थ विसल आणि L चा अर्थ लाँग असा होतो. लगेच शिटी वाजवा. म्हणजे शिटी वाजवणे. हे बोर्ड रेल्वे क्रॉसिंगसाठी शिटी सूचक आहेत.

बोर्डवर इंग्रजीमध्ये W/L आणि हिंदीत सी/फा असं लिहिलेलं असतं. बोर्ड ट्रेनच्या ड्रायव्हरला हा संकेत देतात की, पुढे रेल्वे फाटक आहे. अशात तुम्ही रेल्वेची शिटी वाजवत फाटक पार करा. हे रेल्वे क्रॉसिंगच्या 250 मीटर आधी लावलेले असतात. त्यासोबतच W/B बोर्ड रेल्वेच्या ड्रायव्हरला हा संकेत देतो की, पुढे पूल येणार आहे. अशात पूल पार करताना शिटी वाजवावी.

















