शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ज्या टूथपेस्टचा रोज वापर करता, त्यात काय काय टाकलं जातं? तुम्हालाही नसेल माहीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:53 IST

1 / 6
Knowledge Story: सकाळी झोपेतून उठल्यावर सगळेच सगळ्यात पहिलं काम करतात ते म्हणजे दात स्वच्छ करणे. ज्यासाठी टूथब्रश आणि टूशपेस्टचा वापर केला जातो. तुम्ही पाहिलं असेल की, काही लोकांना टूथपेस्टची टेस्ट इतकी आवडते की, ते हे खातात सुद्धा. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, टूथपेस्ट बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तुम्हाला नसेल तर माहीत तर आता जाणून घ्या.
2 / 6
काही वर्षांआधी एक चर्चा सुरू होती की, टूथपेस्टमध्ये प्राण्यांच्या हाडांचा चुरा टाकला जातो. त्यावेळी बऱ्याच लोकांनी टूथपेस्टऐवजी मंजनाचा वापर सुरू केला होता. या गोष्टी आता जुन्या झाल्या आहेत. आता तर जास्तीत जास्त लोक टूथपेस्टचाच वापर करतात. फार कमी लोक असे असतील जे मंजनाचा वापर करतात.
3 / 6
टूथपेस्ट तयार करण्यासाठी प्रत्येक कंपनी आता जवळपास एकच फॉर्मूला वापरते. रिपोर्टनुसार, टूथपेस्टमध्ये दातांमधून कीटाणू दूर करण्यासाठी कॅल्शिअम कार्बोनेट आणि डिहायड्रेटेड सिलिका जेल मिक्स केलं जातं. त्यासोबतच फ्लोराइडही यात टाकलं जातं. यानं दात मजबूत होतात.
4 / 6
पेस्ट वाळू नये म्हणून टूथपेस्टच्या पॅकेटमध्ये ग्लिसरॉल आणि प्रोपॅलिनचा वापर करतात. तुम्हाला अनेकदा जाणवलं असेल की, टूथपेस्टची टेस्ट थोडी गोड असते. यासाठी यात स्वीटनर्सचा वापर केला जातो. त्याशिवाय टूथपेस्टमध्ये नॅचरल गम्स आणि सिंथेटिक सेल्यूलोसही टाकलं जातं.
5 / 6
तुम्ही पाहिलं असेल की, ब्रश करताना पांढरा फेस येतो. पांढराच का येतो? असा प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर सोडिअम लॉरेल सल्फेट आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, काही दशकांआधी टूथपेस्टमध्ये शिंपले, कोळसा, झाडांची साल, राख आणि हाडांचा चुरा टाकला जात होता. पण आता तसं होत नाही.
6 / 6
२०१५ मध्ये जपानमध्ये कोलगेटला बॅन केलं होतं. त्यावेळी यात प्राण्यांच्या हाडांचा चुका मिक्स केल्याची चर्चा झाली होती. पण हा वाद इतका वाढला की, जपानने कोलगेटला बॅन केलं होतं.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके