क्रिएटिव्ह वॉल क्लॉकने अशी सजवा भिंत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 03:12 PM2019-11-11T15:12:43+5:302019-11-11T15:19:21+5:30

घर सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. उत्तम रंगसंगती आणि आकर्षक वस्तूंच्या मदतीने घर छान सजवलं जातं. क्रिएटिव्ह वॉल क्लॉकने भिंत कशी सजवायची हे जाणून घेऊया.

बाजारात आकर्षक आणि विविध आकाराची घड्याळं असतात. त्यांच्या मदतीने घरातील भिंतीला हटके लूक देता येतो.

लाईट कलर असलेल्या भिंतीवर डार्क कलरचे घड्याळ शोभून दिसते.

बर्ड थीम, गुड मेसेज थीम, मोटिव्हेशन, फोटो फ्रेम व्यतिरिक्ट भन्नाट डिझाईन्सची घड्याळं छान दिसतात.

घरातील इंटिरिअर लक्षात घेऊन प्रिंटेड भिंतीवर डिझायनर घड्याळ लावा.

लहान मुलांच्या रुममध्ये फळ, फुल अथवा कार्टून कॅरेक्टर थीमचं घड्याळ लावा.

किचनमध्ये असं हटके डिझाईन असलेलं घड्याळ लावा.

सध्या रेट्रो स्टाईल वॉल क्लॉकचा ट्रेंड आहे.

टॅग्स :घरHome