अबब! ३४ अब्ज रूपयांचं आहे पुतिन यांचं प्रायव्हेट जेट, टॉयलेटमध्येही लावलं आहे सोनं...

By अमित इंगोले | Published: October 3, 2020 03:12 PM2020-10-03T15:12:23+5:302020-10-03T15:24:45+5:30

हे जे बाहेरून जरी साधं दिसत असलं तरी आतून ते साधं नाही. जेटचं इंटेरिअर मनाला आराम देतं. यात अनेक अत्याधुनिक उपकरणं लावली आहेत. ज्याद्वारे राष्ट्रपती कुणाशीही संपर्क करू शकतात.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याकडे ४ प्रेसिडेन्शिअल विमाने आहेत. ज्यातील एक IL-96-300PU हे जेट ५०० मिलियन डॉलरचं आहे. या विमानाबाबत जाणून घेण्यात अनेकजण उत्सुक असतात. भारतीय करन्सीनुसार ही किंमत ३४,२८,७५,००,००० रूपये इतकी होती. म्हणजे साधारण ३४ अब्जच्यावर खर्च आलाय हे विमान तयार करायला. ४ हजार स्क्वेअर फूट कॅबिन एरिया असलेल्या या जेटमध्ये बेडरूम मीटिंग रूम किचन आणि जिमसहीत सगळं काही आहे.

या जेटचं इंटेरिअर फारच शानदार आहे. हे सुंदर बनवण्यासाठी अनेक ठिकाणी सोन्याचा वापर करण्यात आलाय. जेटच्या जास्तीत जास्त भागात गोल्ड प्लेटिंग करण्यात आलंय.

जेटमध्ये मीटिंग रूमही आहे. इथून पुतिन हे त्यांच्या स्टाफसोबत हजारो फूट उंचावरूनही मीटिंग करू शकतात.

या जेटमध्ये आरामदायक बेडरूमही आहे. जर राष्ट्रपतींना झोप आली किंवा थकवा जाणवला तर इथे आराम करू शकतात.

या जेटमध्ये पुतिन यांच्यासाठी एका जिम देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

हे जे बाहेरून जरी साधं दिसत असलं तरी आतून ते साधं नाही. जेटचं इंटेरिअर मनाला आराम देतं. यात अनेक अत्याधुनिक उपकरणं लावली आहेत. ज्याद्वारे राष्ट्रपती कुणाशीही संपर्क करू शकतात.

Read in English