'या' 'ब्यूटी क्वीन'ने पहिल्या प्रियकराला किडनॅप केलं होतं आणि बनवलं होतं सेक्स स्लेव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 12:26 PM2021-10-04T12:26:10+5:302021-10-04T12:36:36+5:30

ही कहाणी आहे ४४ वर्षाआधीची. त्यावेळी २५ वर्षीय मॅककिनीने अमेरिकेतील यूटामध्ये एक ड्रामा क्लासमध्ये १९ वर्षीय मॉर्मन एंडरसनची भेट घेतली. दोघे प्रेमात पडले आणि त्यांच्यात एक भावनिक संबंध तयार झाला.

असं म्हणतात की, खऱ्या प्रेमाचा मार्ग काही सोप नसतो. पण ७० च्या दशकात हॉलिवूडची ब्युटी क्वीन राहिलेल्या जॉयस मॅककिनीने यासाठी जे केलं ते वाचून तुम्ही हैराण व्हाल. तिने कथितपणे आपल्या एक-बॉयफ्रेन्डला सेक्स गुलाम बनवणे आणि त्याचं अपहरण करण्यासाठी हजारो मैलाचा प्रवास केला होता.

ही कहाणी आहे ४४ वर्षाआधीची. त्यावेळी २५ वर्षीय मॅककिनीने अमेरिकेतील यूटामध्ये एक ड्रामा क्लासमध्ये १९ वर्षीय मॉर्मन एंडरसनची भेट घेतली. दोघे प्रेमात पडले आणि त्यांच्यात एक भावनिक संबंध तयार झाला.

पण यादरम्यान अपराध बोधाने ग्रासित झाल्यावर एंडरसनने मॅककिनीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. माजी मिस व्योमिंग वर्ल्ड राहिलेल्या मॅककिनीने त्याला शोधण्यासाठी एका प्रायव्हेट डिटेक्टिवला कामावर ठेवलं होतं.

जेव्हा तिला समजलं की तिचा प्रियकर यूकेमध्ये आहे. तेव्हा मॅककिनीने तीन लोकांना त्याला परत आणण्यासाठी मदत करण्यास तयार केलं. त्यावेळी मॅककिनीने दावा केला की, चर्चकडून तिच्या प्रियकराचं अपहरण करण्यात आलं होतं.

एका व्यक्तीने सांगितलं की, तो मॅककिनीच्या या कामात सहभागी झाला कारण पहिल्यांदा ती त्याला भेटली तर तो तिचं शरीर बघून आकर्षित झाला होता. मॅककिनी आणि तिचा वास्तुकार मित्र कीथ मे ने ओकेहॅम्टनजवळ एक कॉटेज भाड्याने घेतलं होतं. त्यानंतर मॅककिनीने एंडरसनचं आवडीचं जेवण पॅक केल आणि त्याच्याकडे जाण्याआधी द जॉय ऑफ सेक्स मॅन्युअल वाचलं.

मॅककिनीवर आरोप आहे की, यानंतर तिने एंडरसनला ट्रॅक केलं आणि नकली बंदुकीने धमकावत त्याला आपल्या कारच्या मागच्या भागात बांधलं. नंतर ते परत कॉटेजमध्ये आले. ही घटना साधारण ४४ वर्षाआधीची ऑक्टोबर महिन्यातील आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, दावा केला जातो की, मॅककिनीने एंडरसनला १० फूटाच्या साखळीने आणि हातबेड्यांनी बेडवर बांधलं होतं. नंतर त्याची अंडरविअर फाडून अनेकदा त्याच्यासोबत संबंध ठेवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, तिने शपथ घेतली होती की, ती तोपर्यंत असं करत राहणार जोपर्यंत ती गर्भवती होत नाही.

ही घटना ४४ वर्षाआधीची आहे. मॅककिनीने याप्रकरणी पकडली गेल्यावर १९७७ मध्ये एप्सम मॅजिस्ट्रेटला सांगितलं होतं की, ती एंडरसनवर प्रेम करत होती आणि त्याने प्रत्येकवेळी सहमतीने संबंध ठेवले. पण तिच्यावर आरोप होता की, तिने एंडरसनला सेक्स स्लेव्ह म्हणून ठेवलं होतं.

Read in English