कमालच! एक असं एअरपोर्ट जिथे रेल्वे आणि विमान एकाच रनवेचा वापर करतात, बघा खास फोटो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 15:22 IST2025-07-30T14:39:20+5:302025-07-30T15:22:34+5:30
Gisborne Airport : जगातील हे अशाप्रकारची व्यवस्था असलेललं एकुलतं एक विमानतळ आहे.

New Zealand Airport Train Runway: सामान्यपणे विमानतळाच्या धावपट्टीचा वापर केवळ विमानांसाठी केला जातो. पण जर विमानाच्या धावपट्टीवरून रेल्वे धावत असेल तर...आता म्हणाल असं कसं? तर असंच आहे. न्यूझीलॅंडच्या गिसबोर्न एअरपोर्टमध्ये असाच प्रकार आहे. इथे विमान आणि रेल्वेला एकच धावपट्टी शेअर करावी लागते.
गिसबोर्न शहर हे न्यूझीलॅंडच्या नॉर्थ आयलॅंडच्या ईस्ट कोस्टवर वसलेलं आहे. इथे एअरपोर्ट साधारण १६० हेक्टर परिसरात पसरलं आहे. या एअरपोर्टचा रनवे फारच खास आहे. कारण या रनवेच्या मधोमध पाल्मर्सटन नॉर्थ-गिसबोर्न रेल्वे लाइन आहे. ज्यावरून नियमितपणे रेल्वे ये-जा करते. ज्यामुळे हे एअरपोर्ट दोन भागात विभागलं जातं.
पण येथील एक नियम म्हणजे रेल्वे आणि विमान एकाचवेळी रनवेचा वापर करू शकत नाही. जर रनवेवरून रेल्वे जात असेल तर विमान थांबवलं जातं, जर विमान उड्डाण घेणार असेल तर रेल्वे थांबवली जाते. महत्वाची बाब म्हणजे एअरपोर्टकडून रेल्वेचं सिग्नल कंट्रोल केलं जातं. जेणेकरून कोणताही दुर्घटना घडू नये.
गिसबोर्न एअरपोर्टच्या स्टाफसाठी ही फार मोठी जबाबदारी आहे की, विमान आणि रेल्वेच्या टायमिंगवर बारकाईनं लक्ष द्यावं. सकाळी ६.३० वाजतापासून आणि रात्री ८.३० वाजेपर्यंत एअरपोर्ट आणि रेल्वे दोन्ही सक्रिय असतात. त्यानंतर रनवे बंद केला जातो.
जगात पहिल्यांदा तस्मानियाच्या विनयार्ड एअरपोर्टमध्येही असाच सेटअप आहे. पण तिथे २००५ नंतर रेल्वे ऑपरेशन बंद झालं. आता गिसबोर्न जगातील पहिलं असं एअरपोर्ट आहे, जिथे अॅक्टिव रनवेवरून रेल्वे धावते.
गिसबोर्न एअरपोर्ट भलेही लहान असेल, पण येथून दर आठवड्याला ६० पेक्षा जास्त डोमेस्टिक फ्लाइट्स ऑपरेट होतात आणि दरवर्षी साधारण १.५ लाख प्रवाशी या एअरपोर्टवरून प्रवास करतात.
एकीकडे जगभरात एअरपोर्ट टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस हायटेक होत आहे, तर तेच गिसबोर्न एअरपोर्ट आपली जुनीच व्यवस्था सुरक्षितपणे पार पाडत आहे.