झाडांवर फळं-फूलं तुम्ही पाहिली असतील, पण कधी झाडांवर फर्निचर लागल्याचं पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 01:45 PM2019-09-27T13:45:29+5:302019-09-27T13:53:20+5:30

आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल की, झाडांवर फूलं आणि फळं येतात. पण एक असं कपल आहे, जे झाडांवर फर्निचर उगवतं. होय, हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी खरं आहे. हा कारनामा इंग्लंडमधील गेविन आणि एलिस मुनरो या कपलने केला आहे. या दोघांचं मत आहे की, ५० वर्ष जुन्या झांडाना कापून फर्निचर तयार करण्यापेक्षा झाडांवरच फर्निचर तयार करणं चांगला पर्याय आहे.

गेविन मुनरो यांचं म्हणणं आहे की, त्याला या कामाची आयडिया बालपणीच आली होती. एकदा त्याने पाहिलं होतं की, एक बोन्साय झाड खुर्चीसारखं दिसत आहे. त्यानंतर २००६ साली गेविनने सुद्धा घरी दोन खुर्च्या झाडावर उगवल्या.

२०१२ मध्ये गेविनने एलिससोबत लग्न केल्यावर यावर प्रोफेशनलपणे काम करू लागले.

यासाठी कपलने एक मोठं शेतंच तयार केलं आहे. या शेतात खुर्ची, टेबल, लॅंम्प इत्यादी आकारात झाडे उगवली जातात.

या कपलनुसार, ते ज्याप्रकारचं फर्निचर तयार उगवत आहेत, त्यासाठी जास्त वेळ लागतो. झाड फर्निचरच्या रूपात येण्यासाठी ६ ते ९ महिने वेळ लागतो. जवळपास इतकाच वेळ झाडांना वाळण्यासाठी लागतो.

गेविन आणि एलिस मुनरोने आतापर्यंत २५० खुर्च्या, १०० लॅम्प आणि ५० टेबलच्या आकाराची झाडे उगवली आहेत.

शेतात उगवलेल्या एका टेबलाची किंमत ११ लाख, खुर्चीची किंमत ८ लाख आणि लॅम्पची किंमत ८० हजार आहे.