शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नशिब चमकलं! मासा किंवा कासव नाही तर समुद्र किनारी मासेमारांना सापडलं सोनं, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 3:48 PM

1 / 5
वेनेजुएलाच्या कॅरिबियन किनाऱ्यावर झोपडीत राहत असलेल्या मासेमाराचे नशीब पालटलं आहे. त्या सकाळची सुर्याची किरणं ही आयुष्य पालटणारी ठरली आहेत. मासेमार योलमॅन लारेसने समुद्र किनारी काहीतरी चमकत असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी रेतीत हात टाकून चमकणारी गोष्ट बाहेर काढली. ती वस्तू एखाद्या सुवर्ण पदकाप्रमाणे दिसत होती.
2 / 5
ही गोष्ट सर्व किनाऱ्यावर आणि मासेमारांमध्ये जंगलाच्या अग्निसारखी पसरली आणि प्रत्येकाने सोने मिळवण्यासाठी तेथे धाव घेतली. ग्वाका गावातील बहुतेक मासेमार किनारपट्टीवरील वाळूमध्ये मासेमारी व पॅकिंग उपकरणांसह सोन्याचा शोध घेऊ लागले. लोकांना वाटले की चमत्कार पुन्हा होईल आणि त्यांनाही सोने मिळेल.
3 / 5
2000 लोकसंख्या असलेल्या या खेड्यातील बहुतेक रहिवासी या खजिन्याच्या शोधात सामील झाले. त्यांनी वाळूत खोदायला सुरूवात केली.
4 / 5
डझनभर ग्रामस्थांनी दावा केला की त्यांना किमान एक मौल्यवान वस्तू सापडली आहे ज्यात सोन्याच्या अंगठीचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार काही लोकांनी हे दागिने १५०० डॉलर म्हणेच १ लाख १० हजार ६०७ रूपयांना विकले आहे. अनेकांसाठी हे अनपेक्षित होते. स्थानीक मासेमारी संघटनेतील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ईश्वराच्या कृपेने आम्हाला ही संपत्ती मिळाली.
5 / 5
पहिल्यांदा सोनं सापडलेल्या 25 वर्षीय लॅरेसने सांगितले की, 'सोने पाहून मी हादरलो, मी आनंदाने ओरडलो.' हे माझ्या बाबतीत प्रथमच घडले होते. घरी मी याची माहिती दिली, त्यानंतर ती झपाट्याने पसरली आणि लवकरच गावातले 2000 रहिवासी खजिन्याच्या शोधात सामील झाले.''(Image Credit- Aajtak)
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSea Routeसागरी महामार्गfishermanमच्छीमार