जगातील एक असा पक्षी जो मगरीच्या तोंडात जाऊन स्वच्छ करतो तिचे दात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:28 IST2025-03-11T12:12:11+5:302025-03-11T12:28:09+5:30
Interesting Facts : या पक्षाला मगरीचा 'डेंटिस्ट' म्हटलं जातं. कारण कारण हा पक्षी मगरीच्या दातांमधील मांसाचे कण काढून खातो.

Interesting Facts : मगर हा एक असा जीव आहे ज्याला बघून कुणालाही घाम सुटेल. जगातील सगळ्यात खतरनाक जीवांपैकी एक मगर आहे. इतर जीवही मगरीला घाबरतात आणि तिच्यापासून दूर राहतात. पण तुम्हाला असा विश्वास बसणार नाही की, एक असाही पक्षी आहे जो मगरीच्या तोंडात जाऊन सुरक्षित परत येतो. या पक्षाला मगरीचा 'डेंटिस्ट' म्हटलं जातं. कारण कारण हा पक्षी मगरीच्या दातांमधील मांसाचे कण काढून खातो.
या पक्षाचं नाव इजिप्शिअन प्लोवर आहे. सामान्यपणे इतर कोणताही जीव मगरीच्या जबड्यात सापडल्यावर जिवंत परत येनाही. मात्र, हा छोटासा पक्षी मगरीच्या तोंडात बसून आपलं पोट भरतो.
प्लोवर पक्षी मगरीच्या दातांमधील अडकलेले मांसाचे तुकडे आणि बॅक्टेरिया खाऊन आपलं पोट भरतो. असं करून पक्षाचं पोट भरतं आणि मगरीचे दात साफ होतात. त्यामुळे मगरही शांतपणे तोंड उघडून बसते.
प्लोवर पक्षी जास्तकरून यूरोप आणि आशियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. यांची चोच छोटी असते आणि जेवणाच्या शोधात ते थोडं दूर धावतात, नंतर पुन्हा पुढे जातात. धावत-उड्या मारत ते मगरीजवळ पोहोचतात.
तसे प्लोवर पक्षी जमिनीवरील छोटे कीटक, छोटे जीव खाऊन आपलं पोट भरतात. जेवणाच्या शोधात ते मगरीच्या तोंडापर्यंतही पोहोचतात. मगरीच्या तोंडात बसून जेवण करणाऱ्या या पक्षाचे फोटो नेहमीच चर्चेत येतात.
मगरीबाबत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला माहीत नसतील. जसे की, मगर पृथ्वीवरील सगळ्यात जुन्या जीवांपैकी एक आहेत. मगर डायनासॉर काळापासून पृथ्वीवर आहेत. त्यांचे साधारण २०० मिलियन वर्षाआधीचे मानले जातात. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्यात अजूनही काही बदल झाले नाहीत.
मगर खूप चांगले शिकारी असतात. पाण्यात ते २४ ते २९ किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं पोहू शकतात. तर जमिनीवर ते साधारण १७ किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं धोवू शकतात.