'या' टिप्स वापरून करा विजेची बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 05:02 PM2019-10-21T17:02:40+5:302019-10-21T17:16:28+5:30

विजेची बचत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेकदा घाई-गडबडीत टीव्ही, फॅन, लाईट्स बंद करायला लोक विसरतात. त्यामुळे वीज बिल जास्त येतं. 'या' टिप्स वापरून विजेची बचत करा.

घरामध्ये नॉर्मल बल्बच्या जागी लो एनर्जी बल्ब अथवा सीएफएल लाईट्स लावा. यामुळे विजेची बचत होईल.

टीव्ही, लॅपटॉप, संगणक, मिक्सरसारख्या इतर उपकरणांचा वापर करून झाल्यानंतर आठवणीने ते बंद करा.

गरम होत असल्याने एसी आणि कूलरचा वापर केला जातो. मात्र आवश्यकता नसल्यास ते बंद करा. खिडक्या उघडा म्हणजे बाहेरची मोकळी हवा आतमध्ये येईल.

लँपचा वापर घरामध्ये केला जातो. मात्र याचा रोज वापर न कराता काही खास कार्यक्रमांसाठी वापर करा.

संगणक, लॅपटॉपवर काम करताना थोडा ब्रेक घ्या आणि काही वेळ मॉनिटर बंद करा.

घरामध्ये ऑटोमॅटीक मशीनचा वापर करा. ज्यामध्या सेट असेल. त्यामुळे आपोआप गरज नसताना उपकरणं बंद होतील.

फोन, लॅपटॉप चार्ज केल्यानंतर स्विच बोर्ड न विसरता बंद करा.

टॅग्स :वीजelectricity