बाबो! चपलेची किंमत आहे का हिऱ्याची? तुमचा पगारही असेल कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 16:52 IST2018-10-30T16:44:27+5:302018-10-30T16:52:23+5:30

तशा तर तुम्ही अनेक महागड्या चप्पल वापरल्या असतील किंवा पाहिल्या असतील. पण निदान त्यांना पाहिल्यावर त्या महाग असतील असं वाटत तरी असेल. सर्वसामान्य लोक फार फार तर १५० रुपयांची चप्पल वापरतील. म्हणजे चपलेवर इतकाच खर्च करायचा हे जवळपास ठरलेलंच असतं. पण सध्या एक सामान्य दिसणारी चप्पल तिच्या किंमतीमुळे चर्चेत आली आहे.

अॅमेझॉन वेबसाईटवर या लक्झीरिअस चपलेची किंमत सर्वसामान्यांच्या महिनाभराच्या पगारापेक्षाही जास्त आहे.

होय...या चपलेची किंमत चक्क ४५ हजार रुपये इतकी आहे. ही चप्पल वेलेंटिनो हवाईयानाय ब्रॅन्डसोबत मिळून लॉन्च केली आहे.

ही चप्पल खास पुरुषांसाठी तयार करण्यात आली आहे. अॅमेझॉन सेलमध्ये ही चप्पल उपलब्ध असून याची चर्चा सगळीकडे रंगली आहे.

इतकेच नाही तर ज्या लोकांना अशा महागड्या चप्पल वापरण्याची आवड असते. पण पैशांच्या अभावी खरेदी करु शकत नाहीत, त्यांच्यासाठी वेबसाईटने EMI ची सुविधाही दिली आहे. त्यानुसार ग्राहकांना महिन्याला २, १३७ रुपयांची EMI भरावी लागेल.

बरं...इतकी महागडी चप्पल असूनही याची डिलिवरी फ्रि नाही. यासाठी ग्राहकांना ७६६ रुपये मोजावे लागणार आहेत.