शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जगातील सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम, तब्बल १२ दिवस एकाच जागी अडकून होते लोक; झालं काय होतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:16 IST

1 / 8
World's Longest Traffic Jam: महानगरांमधील रोज होणाऱ्या ट्रॅफिक जॅमची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर होत असते. मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर सुद्धा नेहमीच वाहतूक कोंडी होऊन लोकांची गैरसोय होते. अनेक तास लोकांना एकाच जागी अडकून रहावं लागतं. पण आज आम्ही आपल्याला एका अशा वाहतूक कोंडीबाबत सांगणार आहोत, जी जगातील सगळ्यात मोठी वाहतूक कोंडी होती. तब्बल १२ दिवस एका ठिकाणी ट्रॅफिक जॅम झालं होतं. अशात गाड्यांच्या १०० किलोमीटरपर्यंत रांगाच रांगा लागल्या होत्या.
2 / 8
१० ऑगस्ट २०१० रोजी हा जगातील सगळ्यात मोठा जॅम लागला होता. जॅम इतका मोठा होता की, १२ दिवसांपर्यंत लोक वाहनांमध्ये अडकून होते. त्यांनी तिथेच खाणं-पिणं केलं आणि गाडीत झोपले. म्हणून या जॅमला जगातील सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम म्हटलं जातं.
3 / 8
हा जॅम १०० किलोमीटर परिसरात पसरला होता. हा ट्रॅफिक जॅमच्या इतिहासात एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. असं सांगितलं जातं की, चीनच्या नॅशनल हायवे नंबर ११० वर हजारो गाड्या जॅममध्ये अडकल्या होत्या. वरून जर पाहिलं तर या गाड्या मुंग्यांसारख्या दिसू लागल्या होत्या.
4 / 8
हा जॅम चीनची राजधानी बीजिंगला मंगोलियासोबत जोडणाऱ्या नॅशनल एक्सप्रेसवेवर लागला होता. इथे कार आणि ट्रकांची मोठी लाईन लागली होती. १२ दिवसांपर्यंत पूर्ण जीवन ठप्प झालं होतं.
5 / 8
हा जॅम मंगोलिया ते बीजिंगपर्यंत कोळसा आणि निर्माण साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकांमुळे लागला होता. बीजिंग आणि तिबेटला जोडणारा महामार्गाचं त्यावेळी काम सुरू होतं. त्यामुळे वाहनं पुढे जाऊ शकत नव्हती.
6 / 8
ट्रॅफिक जॅम इतका लांब होता की, यात अडकलेली वाहनं दिवसभरात केवळ १ किलोमीटर अंतरच पार करू शकत होते. काही वाहनांचे ड्रायव्हर तर ५ - ५ दिवस इथे अडकून पडले होते. जॅममुळे हायवेवर जत्रेचं वातावरण तयार झालं होतं. लोक वाहनांजवळ चेस आणि इतर खेळ खेळत वेळ घालवत होते.
7 / 8
रस्त्यावर उभी असलेली वाहनं पायी जाणाऱ्या लोकांसाठी घरं बनली. लोक उपाशी-तापाशी अडकून बसले होते. स्थानिकांनी याचा फायदा घेत इथे दुकाने उघडली. लोकांना ते खाण्या-पिण्याच्या वस्तू विकू लागले. तेही दुप्पट पैसे घेऊन.
8 / 8
अधिकाऱ्यांनी रात्री जास्तीत जास्त ट्रकांना बीजिंगमध्ये प्रवेशाची परवानगी दिली. ज्यामुळे जॅम सुटला. शेवटी तब्बल १२ दिवसांनंतर २६ ऑगस्ट रोजी जॅम पूर्णपणे मोकळा झाला. त्यानंतर वाहनांना योग्यपणे बाहेर काढण्यात आलं.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेTrafficवाहतूक कोंडी