जगातील एक असा दगड जो पाण्यात कधीच बुडत नाही, तुम्हालाही माहीत नसेल याची माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:59 IST2025-04-03T14:18:10+5:302025-04-03T14:59:29+5:30

Pumice Stone : अनेकांना हे माहीत नाही की, जगात एक असाही दगड आहे जो पाण्यात बुडण्याऐवजी पाण्यावर तरंगतो. त्याबाबतच आज जाणून घेणार आहोत.

Pumice Stone : पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची कल्पना आजही लोकांना नाही. या गोष्टी अशा असतात ज्याबाबत माहिती समोर आल्यावर संशोधकही हैराण होतात. तुम्ही बालपणी एक गोष्ट ऐकली असेल. ज्यात एक कावळा तहान लागल्यानंतर एका मडक्यात थोडं पाणी टाकल्यावर त्यात खडे टाकून पाणी वर आणतो आणि आपली तहान भागवतो.

सामान्यपणे कोणतेही दगड पाण्यात बुडतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, जगात एक असाही दगड आहे जो पाण्यात बुडण्याऐवजी पाण्यावर तरंगतो. त्याबाबतच आज जाणून घेणार आहोत.

सामान्यपणे कोणत्याही जड वस्तू किंवा दगड पाण्यात बुडतात. पण प्यूमिस स्टोन (Pumice Stone) हा नियम तोडतो. कारण तो पाण्यात बुडत नाही.

हा दगड फार खरदळ, छिद्र असलेला आणि स्पंजसारखा असतो. याचं वजन इतर दगडांच्या तुलनेत फार कमी असतं. ज्यामुळे पाण्यात बुडण्याऐवजी तो पाण्यावर तरंगतो.

या दगडावर छोटे छोटे हवा भरलेले छिद्र असतात. ज्यामुळे ते हलके होतात आणि पाण्यावर तरंगतात. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा गरम लाव्हारस वेगानं थंड होता आणि त्यातील गॅस अडकून दगडांमध्ये छोटे छोटे छिद्र निर्माण करतो.

याच प्रक्रियेमुळे प्यूमिस स्टोन तयार होतात. जे नंतर समुद्रात सापडतात. या दगडांचा वापर सौंदर्य प्रसाधने, बांधकाम आणि स्क्रबिंगसाठी केला जातो.

जगातील लोकांना या खास दगडाबाबत फार कमी माहीत असतं. त्यामुळे यापुढे एखादा असा दगड पाण्यात टाकल्यावर अचंबित होऊ नका. हा तोच रहस्यमय प्यूमिस स्टोन असू शकतो.