आयुष्यात फक्त एकदाच आंघोळ करतात येथील महिला, जाणून घ्या शरीर स्वच्छ कसं ठेवतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:34 IST2025-02-03T12:18:33+5:302025-02-03T12:34:47+5:30
Himba tribe : या समाजातील महिला आंघोळ न करता स्वत:ला कशा स्वच्छ ठेवतात? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...

Africa Himba Tribe: जगभरात वेगवेगळ्या आदिवासी जमाती आहेत. हे लोक आजही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जंगलांमध्ये जीवन जगतात. त्यांच्या चालीरितीही खूप वेगळ्या असतात. आफ्रिकेतील हिंबा जमातही अशीच अनोखी आहे. या जमातीमध्ये आंघोळ न करणं त्यांच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग आहे. अशात या समाजातील महिला आंघोळ न करता स्वत:ला कशा स्वच्छ ठेवतात? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...
हिंबा जमातीमधील लोक आफ्रिकेच्या नामीबिया आणि दक्षिण अंगोलामध्ये राहतात. या जमातीमधील लोक खाण्याचे शौकीन असतात. येथील महिला जीवनात केवळ एकदाच आंघोळ करतात, त्याही लग्नाच्या दिवशी.
वाळवंटी भागात राहणारे हिंबा जमातीमधील लोक पाण्याबाबत फारच संवेदनशील आहेत. त्यामुळे हे लोक नियमितपणे आंघोळ करत नाहीत. तसेच महिला केवळ त्यांच्या लग्नाच्या दिवशीच आंघोळ करतात.
हिंबा जमातीमधील महिला शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी पाण्याऐवजी जडीबुटी उकडून त्यांची वाफ घेतात. त्याशिवाय ते प्राण्यांची चरबी आणि हेमटाइट नावाच्या एका मिनरलपासून तयार लोशनचा वापर करतात. या लोशनमुळे त्यांची कीटक आणि उन्हापासून बचाव होतो.
शरीरावर हेमटाइटपासून तयार लोशन लावल्यानं हिंबा जमातीमधील महिलांची त्वचा पूर्णपणे लाल दिसते. हेमेटाटाइलची धूळ त्यांची त्वचा पूर्णपणे लाल करतात. यामुळे येथील महिलांना 'रेड मॅन' असंही म्हटलं जातं.
हिंबा जमातीमधील महिला आपल्या शरीरावर लाल रंगाची मातीही लावतात. तर त्या केवळ लुंगी घालतात. त्यांचं अर्ध शरीर पूर्णपणे उघडं असतं. येथील महिलांसाठी त्यांचे स्तन उघडे ठेवणं त्यांच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग आहे.
हिंबा जमातीची खासियत म्हणजे इथे महिला लग्नानंतर एकापेक्षा जास्त पुरूषांसोबत संबंध ठेवू शकतात. तसेच या जमातीमधील महिला आर्थिक निर्णयही घेतात. तेच कोणत्याही खर्चाचा निर्णय महिलाच घेतात.