सोलापूरात 'नाग'पूर; इथल्या घरांमध्ये नागच नाग!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 01:06 PM2018-11-28T13:06:27+5:302018-11-28T15:32:37+5:30

नागाचं नुसतं नाव काढलं तरी अनेकांची घाबरगुंडी उडते. नाग पाळले जातात असं कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. मात्र हे खरं आहे. भारतात एक असं शहर आहे जिथे घरामध्ये नाग पाळले जातात. या अनोख्या शहराबाबत जाणून घेऊया.

महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ या गावात नाग पाळले जातात. गावातील प्रत्येक घरात नाग आढळून येत असल्याने शेटफळ ‘नागांचे गाव’ म्हणून ओळखले जाते.

प्रत्येक घरात सदस्याप्रमाणे नाग वावरत असतात. गावामध्ये घरातील छताच्या लाकडांमध्ये नागांसाठी विशेष जागा असते.

घरामध्ये नाग पाळले जात असले तरी आजपर्यंत कुठलीही हानी अथवा कुणालाही दंश झाल्याची घटना गावात घडली नाही.

शेटफळ गावातील लोक हे नाग देवता आणि भगवान शंकर यांची पूजा करतात. त्यांच्यावर गावातील लोकांची खूप श्रद्धा आहे.

गावातील नागांना लहान मुलेही घाबरत नाहीत. मुलांच्या शाळेतही नाग असतात. नागांचे हे गाव पाहण्यासाठी परदेशातूनही पर्यटक येत असतात.