आजीवन ब्रम्हचारी असूनही महर्षि वात्स्यायनांनी कसं लिहिलं 'कामसूत्र' सारखं पुस्तक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 12:48 PM2020-07-16T12:48:42+5:302020-07-16T13:12:05+5:30

जगभरात ज्या सर्वात प्राचीन पुस्तकाची चर्चा होत असते, ज्याची सर्वात जास्त विक्री होते आणि जे पुस्तक प्रमाण मानलं जातं ते पुस्तक आहे महर्षि वात्स्यायनचं कामसूत्र.

जगभरात ज्या सर्वात प्राचीन पुस्तकाची चर्चा होत असते, ज्याची सर्वात जास्त विक्री होते आणि जे पुस्तक प्रमाण मानलं जातं ते पुस्तक आहे महर्षि वात्स्यायनचं कामसूत्र.

आश्चर्याची बाब म्हणजे वात्स्यायन हे आयुष्यभर एकटे होते आणि त्यांनी ब्रम्हचर्याचं कठोरपणे पालन केलं होतं. मग प्रश्न असा पडतो की, त्यांनी हे इतकं प्रामाणिक पुस्तक लिहिलं कसं?

हे तर आपणा सर्वांनाच माहीत आहे की, जगातली सर्वात जास्त विकलं जाणारं पुस्तक कामसूत्र लेखक महर्षि वात्स्यायन यांचं आहे. पण आपल्यापैकी फार कमी लोकांना हे माहीत असेल की, वात्स्यायन हे आजीवन ब्रम्हचारी होते.

तरी सुद्धा त्यांच्याज शारीरिक संबंधाची प्रगाढ समज होती. या कलेला त्यांनी अनेक नवीन आणि सुंदर अर्थ दिले. चला जाणून घेऊ कामसूत्राचे लेखक वात्स्यायन यांच्याबाबत...

महर्षि वात्स्यायन यांनी पहिल्यांदा वैज्ञानिक रूपाने सांगितले की, आकर्षणातं विज्ञान अखेर काय आहे. त्यांचं मत होतं की, ज्याप्रमाणे आपण जीवनाशी निगडीत वेगवेगळ्या गोष्टींवर बोलतो, त्याचप्रमाणे आपण शारीरिक संबंधाची उपेक्षा करायला नको.

वात्स्यायन हे धार्मिक शिक्षणासोबत जोडलेले होते. अर्थातच त्यांनी कामसूत्र लिहिले पण त्यांच्याबाबत म्हटले जाते की, ते कधीही शारीरिक संबंधासारख्या क्रियेशी संलग्न नव्हते.

असे म्हटले जाते की, वात्स्यायनने कामसूत्र वेश्यालयांमध्ये जाऊन बघितलेल्या मुद्रा नगरवधू आणि वेश्यांसोबत बोलून लिहिल्या.

प्रसिद्ध लेखिका वेंडी डोनिगर यांनी त्यांच्या रिडिमिंग द कामसूत्र पुस्तकात विस्ताराने लिहिले आणि महर्षि वात्स्यायन यांच्याबाबतही लिहिले आहे.

इतिहासकारांनुसार, वात्स्यायन यांना वाटलं की, शारीरिक संबंधाच्या विषयावर खुली चर्चा झाली पाहिजे. याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही.

त्यांनी त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांना याबाबत चांगली माहिती मिळावी याची काळजी घेतली. आजही जगभरातील लोक हे पुस्तक रेफर करतात. हजारो वर्षांनंतरही हे प्रासंगिक आहे.

वात्स्यायन महान दार्शनिक होते. त्यांनी न्याय सूत्र नावाचंही पुस्तक लिहिलं होतं. हे पुस्तक आध्यात्मिक उदारवादावर होतं. ज्यात जन्म आणि जीवनाबाबत सांगण्यात आलं. यात मोक्षावरही लिहिण्यात आलंय. पण या पुस्तकाची फार चर्चा झाली नाही.