वर्षानुवर्षे ओसाड पडलेल्या गुहेत सापडली सोन्याची खाण, 'या' देशाचा होणार मोठा फायदा....

By अमित इंगोले | Published: October 27, 2020 05:06 PM2020-10-27T17:06:46+5:302020-10-27T17:14:00+5:30

या खाणीमुळे देशातील लोकांना नोकरी मिळणार आहे. सोबतच आजूबाजूच्या परिसरातही वेगाने रिसर्च अभियानाला सुरूवात केली जाणार आहे. जेणेकरून अशा आणखी अशा खाणींचा शोध घेतला जाईल.

कधी कधी मनुष्यासमोर अशा काही गोष्टी येतात, ज्यांनी केवळ एका व्यक्तीचं नाही तर अनेक लोकांचं जीवन बदलू शकतं. पण अनेक काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. ज्यामुळे अनेक किंमती गोष्टी आपल्या नजरेपासून दूर राहतात. असंच काहीसं स्कॉटलॅंडमध्ये झालं. येथील एका नॅशनल पार्कमध्ये अनेक वर्ष जुनी गुहा होती. पण कधीच कुणी त्यात गेलं नव्हतं. पण आता जेव्हा त्यात लोक गेले तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण ही गुहा सोन्याची खाण होती. या खाणीत अब्जो रूपयांचं सोनं सापडलं. आता स्कॉटलॅंड सरकार नोव्हेंबरपासून या खाणीत खोदकाम करणार आहे. याने देशाला मोठा फायदा होणार आहे. सोबतच लोकांनाही याचा लाभ होईल.

स्कॉटलॅंडच्या ज्या भागात ही खाण सापडली तो भाग घनदाट जंगल आणि डोंगरांसाठी ओळखला जातो. इथे अनेक अशा गुहा आहेत ज्यांना कधी कुणीच स्पर्श केला नाही. याच गुहा आता देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या तयारीत आहेत.

या खाणीचं नाव कोनिश माइन आहे. ही स्कॉटलॅंडच्या टिनड्रम आणि ट्रॉसच्स नॅशनल पार्कच्या मधोमध आहे. या खाणीतून नोव्हेंबरमध्ये प्रॉडक्शन सुरू होईल. ही या देशात सापडलेली पहिली सोन्याची खाण आहे.

या खाणीमुळे देशातील लोकांना नोकरी मिळणार आङे. सोबतच आजूबाजूच्या परिसरातही वेगाने रिसर्च अभियानाला सुरूवात केली जाणार आहे. जेणेकरून अशा आणखी अशा खाणींचा शोध घेतला जाईल.

या खाणीच टेंडर स्कॉटगोल्ड रिसॉर्सला देण्यात आलं आहे. ही कंपनी या खाणीतून वर्षाला २३ हजार ५०० औंस सोनं काढावं. सध्या या खाणीत असलेल्या सोन्याची अंदाजे किंमत २२ अब्ज २८ कोटी रूपये लावण्यात आली आहे.

यातील एकूण सोन्यातील २५ टक्के सोन्याचे दागिने करून विकण्याची तयारी आहे. ज्यामुळे आता ज्वेलरीच्या दुनियेत स्कॉटलॅंडही समोर येणार आहे.

असेही सांगितले जात आहे की, या खाणीमुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. या खाणीतच सोनं नाही तर याच्या भींतीही सोन्याच्या आहेत. अनेक लोकांनी या खाणीतील सोनं घेण्याची तयारी दर्शवली आहे.

तशी तर ही खाण १९८०च्या आसपास समोर आली होती. पण त्यावेळी कुणीही याकडे लक्ष दिलं नाही. यातून काहीच प्रॉडक्शन होऊ शकलं नाही आणि लोक याबाबत विसरले. आता जेव्हा देशाला गरज पडली, तर यात पुन्हा शोधलं गेलं.