पत्नीला सोडून विवाहित महिलेशी अफेअर, प्रेग्नेन्सीच्या गुपिताने पलटला सगळा खेळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 14:41 IST
1 / 8नात्यात चढ-उतार येणं सामान्य बाब आहे. पण जेव्हा स्थिती हाताबाहेर जाते तेव्हा एक्सपर्टकडून सल्ला घेण्याची गरज पडते. नाव न सांगण्याच्या अटीवर एका पुरूषाने रिलेशनशिप एक्सपर्टकडे मदत मागितली. पुरूषाने द गार्जियनच्या कॉलममध्ये त्याच्या लव्ह लाइफशी संबंधित समस्येबाबत लिहिलंय. (प्रतिकात्मक छायाचित्र)2 / 8पुरूषाने लिहिले की, 'लॉकडाऊनआधी माझं एका विवाहित महिलेसोबत अफेअर सुरू झालं होतं. तिचं नाव होतं जे होतं. जे मला म्हणाली होती की, मीच तिचं खरं प्रेम आहे आणि ज्या फीलींग्स तिला माझ्यासोबत जाणवतात त्या कधीही तिला जाणवल्या नाहीत. मलाही तिच्याबाबत तेच वाटत होतं'.3 / 8'जे. आधीच विवाहित होती. पण पतीसोबत वाद झाल्यावर तिने त्याला सोडलं होतं. मीही विवाहित होतो. पण पत्नीसोबत ताळमेळ जमत नसल्याने मीही तिच्यापासून वेगळा झालो होतो. आता आम्ही दोघे एका नव्या लाइफची सुरूवात करण्यासाठी तयार होतो'.4 / 8'लवकरच मला समजलं की, जे प्रेग्नेंट आहे. ती प्रेग्नेंट झाल्यावर या प्रभाव आमच्या नात्यावरही पडू लागला. आम्हा दोघांनाही सोबत बाळ हवं होतं, पण ते इतक्या लवकर होईल याचा आम्ही विचार केला नव्हता. मला ही स्थिती सांभाळता येत नव्हती. आमच्यात हळूहळू दरी निर्माण होऊ लागली होती. पण हे नातं मला संपवायचं नव्हतं'.5 / 8'काही आठवड्यांनी जे ने मला एक स्कॅन रिपोर्ट पाठवला आणि म्हणाली की, तिच्या होणाऱ्या बाळाचे वडील तिचा पती आहे मी नाही. त्यासोबतच जे म्हणाली की, आता तिला माझ्यासोबतचं नातं संपवायचं आहे. मी अनेकप्रकारे रिपोर्टचा चौकशी केली. माहीत नाही, पण मला असं वाटत होतं की, ते बाळ माझंच आहे. पण जे. ते मान्य करत नव्हती. ती पुन्हा पुन्हा हेच सांगत होती की, ते बाळ तिच्या पतीचं आहे'.6 / 8'जे. म्हणाली की तिला तिच्या प्रेग्नेन्सीचा काळ आरामात आणि शांतपणे घालवायचा आहे. तिला नात्यांचं प्रेशर घ्यायचं नाहीये. ती तिच्या पतीसोबतही संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या पतीला माझ्याबाबत माहीत नाही. आता तिने माझ्यासोबतचा संपर्क बंद केलाय. मला याचा धक्का बसलाय आणि मला हे नातं संपवायचं नाहीये. पण मला तिला नाराजही करायचं नाहीये'.7 / 8पुरूषाने शेवटी लिहिलं की, 'मी त्या बाळासाठी प्रत्येक महिन्यात थोडे पैसे वाचवून ठेवतो. जेणेकरून त्याला भविष्यात गरज पडली तर त्याला मदत करता येईल. माहीत नाही हे योग्य आहे की चूक. मला काही कळत नाहीये. प्लीज माझी मदत करा'.8 / 8रिलेशनशिप एक्सपर्ट एनालिसा बारबिरीने या पुरूषाला उत्तर देत लिहिले की, 'जर जे. ने तिच्या पतीला घटस्फोट दिला नाहीये तर कायदेशीर तिच्या बाळावर तुमचा काहीच अधिकार नाही. पण प्रकरणाच्या खोलात जाण्यासाठी तुम्ही बाळ झाल्यावर त्याची डीएनए टेस्ट करू शकता. पण यासाठीही जे. ची सहमती असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला पूर्ण खात्री आहे की, बाळ तुमचंच आहे. तर जे. ने मनाई केल्यावरही तुम्ही कोर्टाची मदत घेऊ शकता. हे सगळं तुम्ही तेव्हाच करावं जर तुम्हाला आयुष्यभर त्या बाळाला सांभाळायचं असेल'.