खोदकाम करताना मजूराला सापडला खजिना, मडक्यात जे दिसलं ते पाहून लोक झाले अवाक्...

Published: June 30, 2020 10:36 AM2020-06-30T10:36:27+5:302020-06-30T10:50:41+5:30

एक घटना राजस्थानमधून समोर आली आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात एका व्यक्तीला खोदकाम करताना एक जुनं मडकं सापडलंय.

खोदकाम करताना अनेक जुन्या अमूल्य वस्तू किंवा खजिना मिळाल्याच्या अनेक घटना देश-विदेशातून समोर येत असतात. अशीच एक घटना राजस्थानमधून समोर आली आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात एका व्यक्तीला खोदकाम करताना एक जुनं मडकं सापडलंय.

खोदकाम करताना सापडलेलं मडकं पाहून लोक आश्चर्यात पडले. कारण या मडक्यात तांब्याची दुर्मी 333 नाणी सापडली. ही नाणी सवाई माधोपूर जिल्ह्यातील अल्लापूर गावात सापडली आहेत. येथील एका ठिकाणी मनरेगा अंतर्गत खोदकाम सुरू होतं. तेव्हा अचानक हे मडकं सापडंल. एका मोठ्या दगडाखाली हे मडकं सापडलं.

जेव्हा या मडक्यात पाहिलं तेव्हा त्यात तांब्याची दुर्मीळ नाणी सापडलीत. इथे खोदकाम करणाऱ्या मजूरांनी लगेच याची माहिती अधिकाऱ्यांना दिली.

इथे आलेल्या अधिकाऱ्यांनी नाणी मोजली तर ती 333 भरली. यात काही लहान तर काही मोठी नाणी आहेत. अधिकाऱ्यांनी खोदकाम करताना सापडलेली सर्वच नाणी तहसीलदारांकडे सुपूर्द केलीत. असे सांगितले जात आहे की, या नाण्यांवर फारसी भाषेत काही लिहिलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी, तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील जहीराबाद येथे एका शेतकऱ्याला शेत नांगरताना सोने आणि बरीच रत्ने सापडली. ही कहाणी फिल्मी वाटेल पण खरी आहे. एवढेच नव्हे तर त्या शेतकऱ्याला जमिनीच्या खालून अनेक कलाकृती सापडल्या

हा सर्व खजिना सोने, चांदी आणि तांब्याचा आहे. येरगडापल्ली गावचा शेतकरी याकूब अली पिकाची पेरणीसाठी शेतात नांगरणी करीत होते. तेच तेव्हा त्यांना जमिनीखाली सोने आणि अनेक रत्ने मिळाली.

शेतात नांगरणी करताना याकूब अलीच्या नांगराला काहीतरी धडकले. मग त्याने ते काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा याकूब अलीने नीट पाहिले, तेव्हा त्याला धक्का बसला. सुरुवातीला त्यांना पितळेची तीन भांडी मिळाली. ज्यात दागिने भरले होते. नंतर आणखी अनेक गोष्टी त्या भांड्यामध्ये सापडल्या.

याबाबत अलीने तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच तेथे गर्दी होती. हे खरं आहे की खोटं पाहण्यासाठी गावकऱ्यांनीही गर्दी केली.

महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातून जहीराबादसाठी रोड जातो, औरंगाबाद निजामांची पहिली राजधानी असायची. जगातील सर्वात श्रीमंत निजाम येथे राहत होते.

पोलिसांनी सांगितले की आतापर्यंत उत्खननात २५ सोन्याची नाणी, गळ्यातील दागिने, अंगठ्या, पारंपारिक भांडी सापडली आहेत. जे पुरातत्व विभागाकडे पाठविण्यात आले आहे. हे दागिने, सोन्याची नाणी, धातूची भांडी कोणत्या युगातील आहेत हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ प्रयत्न करीत आहेत. तपासणीनंतरच योग्य माहिती मिळेल