शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशातील पहिलं प्रायव्हेट रेल्वे स्टेशन जिथे मिळता ५ स्टार सुविधा, बघा आतून कसं दिसतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:02 IST

1 / 9
First Private Railway Station: राणी कमलापती रेल्वे स्टेशनचं री-डेव्हलपमेंट पीपीपी मॉडलवर करण्यात आलं आहे. हे स्टेशन जर्मनीतील हीडलबर्ग रेल्वे स्टेशनच्या मॉडलसारखं विकसित करण्यात आलं आहे. देशातील भोपाळचं राणी कमलापती रेल्वे स्टेशन हे आंतरराष्ट्रीय स्तराचं स्टेशन मानलं जातं.
2 / 9
भोपाळच्या हबीबगंजमधील हे रेल्वे स्टेशन देशातील पहिलं प्रायव्हेट रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनवर एअरपोर्टसारख्या सुविधा मिळतात. हे स्टेशन प्रवाशांना एक चांगला अनुभव देण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे.
3 / 9
या रेल्वे स्टेशनवर राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, गरीब रथ एक्सप्रेस, गतिमान एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस येतात. राणी कमलापती स्टेशनचं डिझाईन खूप मॉडर्न आहे.
4 / 9
स्टेशनवर कव्हर्ड पार्किंग एरिया आहे. जेणेकरून गाड्यांना ये-जा करायला समस्या येऊ नये. हे स्टेश इंटीग्रेटेड मल्पीमॉडल ट्रान्स ट्रांसपोर्टेशन नेटवर्कच्या मुख्य केंद्राच्या रूपात काम करतं.
5 / 9
स्टेशनवरील एसी लाउंज आणि वेटिंग एरियात प्रवाशांना आराम मिळतो. स्टेशनवर ही ठिकाणं ७०० ते १००० लोकांच्या बसण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहेत.
6 / 9
स्टेशनवरील एसी लाउंज आणि वेटिंग एरियात प्रवाशांना आराम मिळतो. स्टेशनवर ही ठिकाणं ७०० ते १००० लोकांच्या बसण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहेत.
7 / 9
स्टेशनवर प्रवाशांसाठी फास्ट स्पीड असलेले एस्केलेटर आणि लिफ्ट आहेत. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला सुद्धा प्राथमिकता दिली गेली आहे. इथे १६० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
8 / 9
राणी कमलापती रेल्वे स्टेशन एखाद्या आलिशान महालासारखं दिसतं. तसेच येथील स्वच्छता पाइव्ह स्टार हॉटेलसारखी असल्याचं सांगितलं जातं. स्टेशनच नाव गोंड राजवंशातील शेवटच्या राणी कमलापती यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे.
9 / 9
भोपाळमधील या रेल्वे स्टेशनच्या मेन्टेनन्सची जबाबदारी बंसल ग्रुपकडे देण्यात आली आहे. बंसल ग्रुपनं हा करार ८ वर्षांसाठी केला आहे.
टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके