कमालीची सुंदर होती Princess Of Hyderabad, तुर्कीत जन्मलेली तरूणी झाली होती निजामाची सून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 03:18 PM2021-06-12T15:18:46+5:302021-06-12T16:09:34+5:30

नीलोफरच्या साड्या फ्रान्समधील एक फॅशन फर्म तयार करत होती. पण एक काळ असाही आला होता जेव्हा तिने साड्या नेसणं सोडून पाश्चिमात्य कपडे घालणं सुरू केलं होतं.

इतिहासात अशा अनेक राजकुमारी आणि राण्या होऊन गेल्या ज्यांच्या सुंदरतेची चर्चा आजही केली जाते. हैद्राबादची राजकुमारी नीलोफर त्या राण्यांपैकी एक होती.

नीलोफरला जगातल्या १० सर्वात सुंदर महिलांपैकी एक मानलं जातं. त्यावेळी लोक तिच्या सौंदर्याचे चाहते होते. ती भारतात कशी आली याचीही कहाणी रोमांचक आहे.

तुर्कीच्या ओट्टोमन राजवंशाची अखेरची राजकन्या नीलोफरला 'सुंदरतेची देवी' म्हटलं जात होतं. नीलोफरचा जन्म तुर्कीची राजधानी इस्तांबुलच्या राजेशाही महालात झाला होता. नीलोफरच्या जन्मावेळ राजपरिवार अखेरच्या घटका मोजत होता आणि त्यांचं साम्राज्य कमी झालं होतं.

केवळ २ वर्षांची असताना नीलोफरने वडिलांना गमावलं होतं. ७ वर्षांची असताना ती आईसोबत तुर्की सोडून फ्रान्समध्ये शिफ्ट झाली होती. फ्रान्समध्ये तिचं जीवन फारच वाईट होतं. त्यांचं जीवन सामान्य लोकांसारखं झालं होतं.

नीलोफरचं नशीब चांगलंच जोरावर होतं आणि आपल्या सुंदरतेमुळे नीलोफर जगातल्या सर्वात श्रीमंत राजपरिवार हैद्राबादच्या निजामाची सून झाली होती.

हैद्राबादच्या शेवटच्या निजामाने आपला दुसरा मुलगा आजम जेहसोबत नीलोफरचं लग्न लावून दिलं होतं. १९३१ मध्ये लग्नानंतर नीलोफर हैद्राबादला आली होती. असे म्हटले जाते की, नीलोफर केवळ सुंदर नव्हती तर आकर्षकही होती.

नीलोफर राजपरिवारातील असण्यासोबतच फॅशन दिवाही होती. तिचे साडी नेसलेले फोटो न्यूयॉर्क फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये लावलेले आहेत.

नीलोफरच्या साड्या फ्रान्समधील एक फॅशन फर्म तयार करत होती. पण एक काळ असाही आला होता जेव्हा तिने साड्या नेसणं सोडून पाश्चिमात्य कपडे घालणं सुरू केलं होतं.

१९४८ मध्ये हैद्राबादचा भारतात समावेश करण्यात आला तेव्हा नीलोफर फ्रान्सच्या दौऱ्यावर होती. आणि ती पॅरिसमध्ये थांबलेली होती १९५२ मध्ये तिने घटस्फोट घेतला. ज्यानंतर तिला पोटगी म्हणून मोठी रक्कम मिळाली. यातील बरीच रक्कम तिने हैद्राबादमध्ये महिला आणि लहान मुलांसाठी हॉस्पिटल बनवण्यासाठी खर्च केली होती.

नीलोफर तिच्या काळात सर्वात सुंदर महिलांपैकी एक होती. अनेक वर्ल्ड मॅगझीनने तिला जगातल्या १० सर्वात सुंदर महिलांमध्ये निवडलं आहे. नीलोफरला हॉलिवूडमधूनही अनेक ऑफर आल्या होत्या. पण तिने कधी सिनेमात काम केलं नाही.