शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

थायलंडच्या 'या' मंदिरातील मूर्ती पाहून उडेल तुमची झोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 3:06 PM

1 / 7
मंदिर हे नाव ऐकताच आपल्या मनामध्ये शांतता आणि श्रद्धा येते. परंतु आज आम्ही अशा काही मंदिरांबाबत सांगणार आहोत जी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मंदिरांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटतं पण येथील मंदिरांमध्ये गेल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल. थायलंडची राजधानी असणाऱ्या बँकॉक शहरापासून जवळपास 700 किलोमीटर दूर असणाऱ्या चियांग माय शहरामध्ये ही मंदिरं स्थित आहेत.
2 / 7
या मंदिरांमध्ये असणाऱ्या जास्तीत जास्त मूर्ती या फार भयानक आहेत. या मूर्तींमधून वेगवेगळ्या पापांसाठी असलेल्या शिक्षा दाखवण्यात आल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर हे मंदिर तयार करण्यामागे एक कारण सांगण्यात येतं. हे मंदिर तयार करण्यामागील मुख्य हेतू म्हणजे, या मंदिरातील भयानक मूर्ती पाहून लोकांच्या मनामध्ये भिती निर्माण होईल आणि ते नेहमी चांगली कामं करतील.
3 / 7
या मूर्तींमार्फत असं देखील सांगण्यात आलं आहे की, जर एखादी व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यात बलात्कार किंवा छेडछाडीसारखे गुन्हे करत असेल तर त्याला शिक्षा मिळणारचं.
4 / 7
थायलंडशिवाय चीनमध्येही अशा प्रकारचं एक मंदिर तयार करण्यात आलेलं आहे, जे याच थीमवर तयार करण्यात आलं आहे.
5 / 7
थायलंडच्या या मंदिरावर थोडा हिंदू धर्माचाही प्रभाव दिसून येतो. येथे गरूड पुराण यांच्यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पापांच्या आधारे 28 प्रकारच्या वेगवेगळ्या शिक्षांचं वर्णन केलं आहे.
6 / 7
कोणत्या पापासाठी कोणती शिक्षा करण्यात आली आहे हे तुम्हाला या मंदिरामध्ये गेल्यावर सहज लक्षात येईल.
7 / 7
या मंदिरातील सर्व मूर्ती लाल रंगाने रंगवल्या आहेत. ज्यामुळे तुम्ही नक्की मंदिरातच आहात ना? हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेThailandथायलंड