अरे देवा! माकडांच्या जीवावर चालणारा ३ हजार कोटींचा उद्योग संकटात; पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 06:05 PM2020-07-09T18:05:08+5:302020-07-09T18:20:18+5:30

थायलँड जगातील सगळ्यात मोठा दूध (नारळचे दूध) उत्पादकांचा देश आहे. पण सध्याच्या काळात अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. थायलँडमध्ये तयार होत असलेल्या नारळ आणि नारळाच्या उत्पादनांना युरोपासह जगभरातून विरोध होत आहे.

न्यूज एजेंसी ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार प्राण्यासाठी काम करणारी पेटा (PETA) ही संस्था याचा विरोध करत आहे.

३ हजार कोटींचा हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर प्राण्यांवर अवलंबून आहे. पण थायलँडमध्ये प्राण्यांशी गैरव्यवहार केल्याचा आरोप लावला जात आहे. प्राण्यांकडून यंत्रांप्रमाणे काम करून घेतले जाते. अशाही चर्चा केल्या जात आहेत. तासनतास प्राण्यांना कामात जुंपून ठेवलं जातं.

पेटाच्या रिपोर्टनुसार जगभरातून थायलँडच्या नारळाच्या व्यवसायाला विरोध केला जात आहे. अनेक ब्रिटिश सुपरमार्केट्समध्ये नारळाच्या उत्पादनांची विक्री बंद केली आहे.

अमेरिकी आणि ऑस्ट्रीयाई गुंतवणूकदार, घाऊक विक्रेत्यांनीसुद्धा यासंबंधी विचारपूस सुरू केली आहे.

ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची पत्नी होणारी कॅरी साइमंड्स हीने ट्विटरवरून माकडांचा वापर करण्यात आलेल्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

आता या व्यवसायाला संकटातून वाचवण्यासाठी थायलँडच्या सरकारने नारळाच्या व्यवसायाशी जोडलेल्या मंत्र्यांची बैठक घेतली आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार या उत्पादनांच्या निर्मीतीसाठी माकडांचा वापर करून घेतला जात नाही. असे उत्पादनाच्या पॅकिंगवर लिहिण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.