'ही' आहेत जगातील सगळ्यात महाग पिस्तुलं, एकेकाची किंमत वाचाल तर उडेल झोप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:11 IST2025-04-08T12:55:41+5:302025-04-08T13:11:51+5:30
Most Expensive Pistol: काही लोक असेही आहेत ज्यांना दुर्मीळ हत्यारं किंवा पिस्तुलं गोळा करण्याची आवड असते. हे लोक दुर्मीळ शस्त्र मोठी किंमत देऊन विकत घेत असतात.

Most Expensive Pistol: जगाभरात असे अनेक लोक आहेत ज्यांना वेगवेगळ्या वस्तू त्यांच्या कलेक्शनमध्ये ठेवायला आवडतात. काही लोक असेही आहेत ज्यांना दुर्मीळ हत्यारं किंवा पिस्तुलं गोळा करण्याची आवड असते. हे लोक दुर्मीळ शस्त्र मोठी किंमत देऊन विकत घेत असतात. अशाच काही जगातील सगळ्यात महागड्या पिस्तुलांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कोल्ट सिंगल-अॅक्शन रिव्हॉल्वरचा वापर 1881 मध्ये बिली द किड याला मारण्यासाठी करण्यासाठी करण्यात आला होता. 2021 मध्ये झालेल्या एका लिलावात या गनसाठी 6 मिलियन डॉलर म्हणजेच 51 कोटी रूपयांपेक्षा जास्त किंमत मोजण्यात आली.
जगातील दुसरी सगळ्यात महाग विकली गेलेली पिस्तुल म्हणजे जॉर्ज वॉशिंगटनची पिस्तुल होती. ही त्याच्याकडून हरवली गेली होती. या पिस्तुलाला लिलावात 1986000 डॉलर म्हणजेच 17 कोटी रूपये इतकी किंमत मिळाली होती.
व्हेनेजुएलातील सैन्य नेता सायमन बोलिवरकडे यांच्याकडे पिस्तुलाची एक जोडी होती. यांचा लिलाव 2014 मध्ये करण्यात आला होता. या पिस्तुलांना 1.76 मिलियन डॉलर म्हणजे 15 कोटी रूपयांना विकण्यात आले होते.
1849 मध्ये कोल्ट द्वारे बनवण्यात आलेल्या पिस्तुलांनाही खूप पसंती होती. कारण या खूप सुंदर आणि सुरक्षित बनवण्यात आल्या होत्या. यांची किंमत 1.1 मिलियन डॉलर म्हणजे 9 कोटी रूपये इतकी सांगण्यात येते.
टेक्सासमधील सॅम विल्सनची कोल्ट वॉकर गनही महागड्या विकल्या गेल्या होत्या. एका रिपोर्टनुसार, आतापर्यंत केवळ 1100 वॉकर पिस्तुली बनवण्यात आल्या होत्या. याची किंमत साधरण 920,000 डॉलर म्हणजे 7 कोटींपेक्षा जास्त आहे.
अमेरिकन डाकू जेसी जेम्सला ज्या बंदुकीनं मारण्यात आली होती ती कॅलिबर स्मिथ अॅन्ड वेसन बंदूक 2003 मध्ये एका लिलावात 350000 डॉलर म्हणजे 3 कोटी रूपयांना विकण्यात आली होती.
कार्ल वाल्थरकडून वाढदिवसाला हिटलरला मिळालेली 'गोल्डन वाल्थर पीपी' गनला लिलावात 114,000 डॉलर म्हणजेच 97 लाख रूपयांपेक्षा जास्त किंमत मिळाली होती.