चमत्कारच! तीन आठवड्यांची गर्भवती महिला पुन्हा झाली गर्भवती, वाचा कसे जन्मले दोन्ही बाळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 10:55 IST2021-04-09T10:43:51+5:302021-04-09T10:55:24+5:30
डॉक्टरने रेबेकाच्या तिसऱ्या अल्ट्रासाउंडमध्ये आणखी एक बाळ असल्याची माहिती दिली. ही फार हैराण कऱणारी बाब होती.

हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण ही घटना एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही की, जी महिला आधीच गर्भवती होती. ती गर्भवती असतानाचा पुन्हा गर्भवती झाली आणि तिने जुळ्या बाळांना जन्म दिला. आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही बाळांचा जन्म एकत्रच झाला. मात्र, दोघांचा कन्सीविंगचा वेळ वेगवेगळा आहे. आधीच प्रेग्नेंट असलेल्या या महिलेने तीन आठवड्यांनंतर दुसरं बाळ कंसीव केलं होतं.
रेबेका रॉबर्ट आणि तिचा पती राइस वीवर अनेक वर्षांपासून बाळासाठी प्रयत्न करत होते. गेल्यावर्षी एका फर्टिलिटी मेडिकेशननंतर डॉक्टरने दोघांना ही आनंदाची बातमी दिली की, ते लवकरच आई-बाबा होणार आहेत. पण कपलला याची अजिबात कल्पना नव्हती की, त्यांचा हा आनंद दुप्पट होणार आहे.
डॉक्टरने रेबेकाच्या तिसऱ्या अल्ट्रासाउंडमध्ये आणखी एक बाळ असल्याची माहिती दिली. ही फार हैराण कऱणारी बाब होती. कारण रेबेकाच्या पोटात आधीच एक 3 आठवड्यांचं भ्रूण वाढत होतं.
रेबेकाने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये लिहिले की, 'गुड मॉर्निंग अमेरिका. मुळात ही फार आश्चर्यजनक बाब होती की, एकाऐवजी दोन बाळ होते. डॉक्टरांनी मला सांगितलं की, दोन बाळांमध्ये तीन आठवड्यांचा फरक होता. हे डॉक्टरांना समजत नव्हतं'.
महिलेच्या या दुर्मीळ प्रेग्नेन्सीबाबत जाणून घेतल्यावर डॉक्टर स्वत: हैराण झालेत. सुरूवातीला त्यांना याबाबत काहीच माहीत नव्हतं. रॉयल यूनायटेड हॉस्पिटलमध्ये प्रेग्नेन्सी अॅन्ड फीमेल रीप्रोडक्टिवच्या स्पेशालिस्ट आणि रेबेकाचे डॉक्टर डेविड वॉकर म्हणाले की, 'रेबेकाची प्रेग्नन्सी एक दुर्मीळ घटना आहे. असं किती वेळा झालं असेल याची काहीच माहिती उपलब्ध नाही'.
रेबेकाच्या प्रेग्नेन्सीला सुपरफेटेशनच्या रूपात डायग्नोस केलं गेलं होतं. एक अशी कंडीशन ज्यात पहिल्या प्रेग्नेन्सी दरम्यान दुसऱ्या प्रेग्नेन्सीची माहिती मिळाली. या स्थितीत ओवरीमधून एग दोन वेगवेगळ्या वेळांवर रिलीज झाले होते.
डॉक्टर वॉकर म्हणाले की, 'आधी मी हा विचार करून हैराण झालो होतो की, मी दुसऱ्या बाळाला मिस कसं केलं. पण नंतर समजलं की, ही माझी चूक नाही. तर ही एक दुर्मील प्रेग्नेन्सी होती. रेबेकाच्या जुळ्या बाळांमध्ये तीन आठवड्यांचं अंतर होतं. दोन्ही बाळ दिसायला लहान-मोठे होते'.
दरम्यान रेबेकाची प्रेग्नन्सी आव्हानात्मक होती. डॉक्टरांनी तिला हेही सांगून टाकलं होतं की, लहान बाळ म्हणजे नंतर कंसीव झालेल्या बाळाला वाचवला जाऊ शकेलच असं नाही. मात्र, रेबेकाने एखाद्या चमत्कारासाऱखं गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये दोन्ही बाळांना जन्म दिला.
लहान बाळाला जन्मानंतर ९५ दिवस NICU मध्ये ठेवण्यात आलं. तर दुसऱ्याला तीन आठवडे ठेवलं. रेबेका तिच्या दोन्ही मुलांना सुपर ट्विंस मानते. ती म्हणते की, त्यांना बघून मला नेहमीच हे वाटतं की, ती किती लकी आहे. रेबेकाची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.