ऐकावं ते नवलच! 39 पत्नी, 94 मुलं, 100 खोल्यांचं घर... 'हे' आहे जगातील सर्वात मोठं कुटुंब
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 15:12 IST2023-02-25T15:09:49+5:302023-02-25T15:12:47+5:30
घरातील पुरुष शेती व पशुपालन करतात. स्वयंपाक आणि घराची साफसफाई ही महिलांची जबाबदारी आहे.

जियोन-आ हे एकाच छताखाली 39 बायका, 94 मुले आणि 33 नातवंडांसह राहत होते. जियोन-आचे कुटुंब जगातील सर्वात मोठे कुटुंब मानले जात असे. मिझोराममधील बटवांग गावात चार मजली घरात जियोन-आ आपल्या संपूर्ण कुटुंबासह राहत होते. या घरात एकूण 100 खोल्या आहेत. (फोटो- रॉयटर्स)
घरातील पुरुष शेती व पशुपालन करतात. स्वयंपाक आणि घराची साफसफाई ही महिलांची जबाबदारी आहे. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा लग्न करून कुटुंब वाढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. लग्नासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात असे ते नेहमी म्हणत असे. (फोटो- रॉयटर्स)
जियोन-आ स्वत: ला भाग्यवान मानत होते की त्यांची काळजी घेणारे बरेच लोक आहेत. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वजण दु:खी झाले. मुख्यमंत्र्यांसह, पक्षाच्या इतर नेत्यांनी जेओंघाक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
मिझोरमचे मुख्यमंत्री म्हणाले होते, मिझोरममधील त्यांचे गाव आणि बक्तवांग तलंगनम हे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे आणि हे केवळ एवढ्या मोठ्या कुटुंबामुळे झाले आहे. "चना" नावाचा पंथ जियोन -आ यांच्या वडिलांनी 1942 मध्ये स्थापन केला होता आणि त्यात शेकडो कुटुंब आहेत.
जियोन-आ 17 वर्षांचे असताना पहिल्या पत्नीशी लग्न केलं आणि एका वर्षात दहा बायका केल्याचा दावा केला. मोठे कुटुंब असूनही, जियोन -आ यांनी 2011 च्या मुलाखतीत रॉयटर्सला सांगितले की त्यांना कुटुंबाचा आणखी विस्तार करायचा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.