कमाल! ट्रेनमध्ये थ्री इडियट्सचा कारनामा; व्हिडीओ कॉलवर डॉक्टरांशी बोलत केली महिलेची डिलिव्हरी
By manali.bagul | Updated: January 19, 2021 16:10 IST2021-01-19T15:27:49+5:302021-01-19T16:10:59+5:30

तुम्हाला आमिर खानच्या थ्री इडियट्स सिनेमातील तो सीन नक्कीच आठवत असेल ज्यामध्ये व्हिडीओ कॉलवर करिनाशी बोलत आमिर एका महिलेची डिलिव्हरी करतो. फक्त सिनेमातच नाही तर प्रत्यक्षात सुद्धा घ़डू शकतं यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. सिनेमातील सीनप्रमाणेच एक घटना समोर आली आहे.
एका लॅब टेक्निशियने व्हिडीओ कॉलच्या मदतीने ट्रेनमध्ये गर्भवती महिलेची डिलिव्हरी केली आहे. या लॅब टेक्निशियनचे नाव सुनिल प्रजापती आहे. उत्तर रेल्वेत सुनिल हे टेक्निशियन म्हणून नियुक्त आहेत. सुनिल दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्थानकावर येणाऱ्या ट्रेनमध्ये होते.
मथुरेजवळ पोहोचल्यानंतर त्यांच्या समोर बसलेल्या महिलेला प्रसृती कळांच्या वेदना सुरू झाल्या. त्यानंतर सुनिलने महिला डॉक्टरला व्हिडीओ कॉल केला. त्यांच्या सल्ल्यानुसार चालत्या ट्रेनमध्ये महिलेची डिलिव्हरी केली.
ट्रेनमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये असलेलं गरजेचं सामान उपलब्ध न झाल्यानं गैरसौयीचा सामना करावा लागला. तरीसुद्धा सुनिल यांच्या प्रयत्नानं यशस्वीरित्या या महिलेची डिलिव्हरी झाली.
सुनिल यांनी सांगितले की, ''जेव्हा मी कांती एक्सप्रेसने येत होतो तेव्हा निजामुद्दीन स्थानकावर माझ्या समोर एक गरोदर महिला बसली होती. फरिदाबाद स्टेशन गेल्यानंतर या महिलेला वेदना सुरू झाल्या. मी या महिलेच्या भावाला विचारणा केल्यास डॉक्टरांनी २० तारिख दिल्याचे कळले. दिल्ली ते निझामद्दीनदरम्यान वेदना सुरू झाल्या.''
त्यांनी पुढे सांगितले की, व्हिडीओ कॉलवर डॉक्टर गाईड करत होते. त्याचप्रमाणे त्यांनी या महिलेची डिलीव्हरी केली. सुनिल यांच्या कार्याचे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विट करत सुनिलचे कौतुक केले आहे. (Image Credit-TOI)