संपूर्ण शरीरावर टॅटू बनवून 'ब्लॅक एलियन' बनला पठ्ठ्या; अन् आता बोलता सुद्धा येत नाहीये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 05:51 PM2021-01-26T17:51:51+5:302021-01-26T18:03:28+5:30

फ्रान्सचा रहिवासी असलेल्या एका माणसाला शरीरावर टॅटू काढण्याचं एव्हढं वेड आहे की त्यानं आतापर्यंत संपूर्ण शरीरावर टॅटू काढून घेतले आहेत. या माणसाचं टॅटूचे वेड फक्त इतकंच मर्यादित नाही तर बॉडी ट्रांसफॉर्मेशनसाठी त्यानं आतापर्यंत अनेक गोष्टी केल्या आहेत.

या माणसानं आपल्या डोळ्यांच्या बुबुळांवरही टॅटू काढून घेतला आहे. आपलं नाक आणि ओठांच्या वरच्या भागावर टॅटू काढून घेतल्यामुळे आता या माणसाला बोलायलाही त्रास होत आहे.

३२ वर्षीय एंथनी लोफ्रेडो सोशल मीडीयावर ब्लॅक एलियन नावानं प्रसिद्ध आहे. एंथनीचे इंस्टाग्रामवर २ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असून त्यांनी एका इंस्टाग्राम लाईव्ह सेशनदरम्यान सांगितले की, संपूर्ण त्वचा काढून त्याववर मेटल लावावं अशी त्यांची इच्छा आहे.

एंथनी आपलं नाक, कान आणि अपर लिप्स मॉडिफाय करण्याचा विचार करत आहेत. फ्रेंच माध्यम मिडी लिब्रेशी बोलताना काही वर्षांपूर्वी त्यांनी सांगितलं होतं की, लहानपणापासूनच मला शरीर ट्रांसफॉर्मेशन करण्यात रस होता.

जेव्हा हा माणूस सिक्योरिटी गार्डच्या जागेवर काम करत होता. तेव्हा त्याला आपलं आयुष्य मनाप्रमाणे जगता येत नव्हतं. म्हणून तो ऑस्टोलियाला रवाना झाला.

माध्यमांनी बोलताना यांनी सांगितले की, ''नेहमीच शरीराच्या मॉडीफिकेशचे विचार डोक्यात येत असायचे.'' सोशल मीडियावर लोकांनी वेगवेगळे प्रश्न विचारल्यानंतर नेहमी एंथनीने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. कारण एंथनीला डार्क रंग पसंत आहे.