लाखो रुपये किंमतीची भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सापडली; विहिरीच्या तळातून बाहेर काढण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 10:11 AM2020-05-29T10:11:12+5:302020-05-29T10:14:33+5:30

कधीकधी अशी प्रकरणे देशाच्या विविध भागांतून समोर येतात, जिथे खोदकाम करताना नाणी किंवा मूर्ती बाहेर पडतात आणि लोक चकित होतात. उत्तर प्रदेशमधील बांदा येथून असाच एक प्रकार समोर आला आहे, जिथे श्री कृष्णाची मुर्ती सापडली ती पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ही संपूर्ण घटना बांदाच्या मवईची आहे, विहीर खोदताना साफसफाईच्या वेळी भगवान श्रीकृष्णाची एक बहुमुल्य अष्टधातू मूर्ती सापडली. मूर्ती मिळताच माहिती संपूर्ण परिसरात पसरली. विशेष म्हणजे ३० वर्षांपासून या मूर्तीचा शोध घेण्यात येत होता, मूर्ती सापडताच एक जुनी घटना पुन्हा ताजी झाली.

वास्तविक, लाखो रुपये किंमतीची ही अष्टधातू मूर्ती भगवान श्रीकृष्णाच्या बाळ रूपात आहे. त्याचे वजन दीड ते दोन किलो आहे. ही मूर्ती सापडताच ३० वर्षांपूर्वी गावातील राम जानकी मंदिरातून ही चोरी झाल्याचे सांगण्यात आले, ही घटना ऐकून काही लोकांना आश्चर्य वाटले कारण अनेकांना त्याबद्दल माहितीही नव्हती.

घटनेची माहिती देताना अप्पर पोलिस अधीक्षक भरत कुमार पाल यांनी सांगितले की, पोलिसांनी अष्टधातूची मूर्ती ताब्यात घेऊन रात्री कोतवालीमध्ये ठेवली आहे. मूर्तीचा उजवा हात कापला गेला हेही आश्चर्य आहे.

ग्रामस्थांनी सांगितले की, बरेच दिवस मूर्ती विहिरीत असण्याची चर्चा होती. याची माहिती ग्रामप्रमुखांनाही देण्यात आली. अखेर पोलिसांच्या उपस्थितीत पंपिंग सेटद्वारे विहिरीतील पाणी बाहेर काढले. यानंतर जे घडले ते पाहून ग्रामस्थ चकित झाले.

अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वीही ही मूर्ती कामगारांना दिसली परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. परंतु हे उघडकीस आल्यानंतर ती काढण्याची प्रक्रिया सुरू झाली असून बुधवारी ही मूर्ती विहिरीतून काढण्यात आली.

विहिरीतून पाणी खाली करताच मूर्ती बाहेर काढण्यात आली. तीस वर्षांपूर्वी चोरीला गेलेली हीच मूर्ती आहे. यावेळी, गावातील सर्व लोक तेथे उपस्थित होते. पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. प्रत्येकजण आळीपाळीने मूर्तीकडे पाहत होता की ती तीच मूर्ती आहे की नाही.

सध्या ग्रामस्थांनी चोरी केलेल्या मूर्तीच्या उजव्या हाताची मागणी केली आहे. कोतवाली नगर पोलिसांनी संबंधित विभागांना मूर्तीची माहिती दिली आहे.

दुसरीकडे मूर्ती मिळाल्यानंतर प्रशासन या मूर्तीचे काय करणार याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. गावात राहणारे ज्ञानेंद्र सिंह म्हणतात की, ही मूर्तीची कोणत्या धातूची बनविली आहे याची माहिती पोलिसांना दिली आहे

आणखी एका गावकऱ्याने सांगितले की, ही मूर्ती गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या देखरेखीखाली काढली गेली आहे. ही अष्टधातूची असू शकते. सध्या पोलिसांच्या पथकाने ही मूर्ती घेतली आहे.

टॅग्स :पोलिसPolice