शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Lockdown : जेवण देता-देता भीक मागणाऱ्या तरूणीच्या पडला प्रेमात, आता लग्न करून थाटला संसार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 12:02 PM

1 / 7
लॉकडाउनदरम्यान अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्या वाचून आश्चर्य होतो. लग्नांच्या वेगवेगळ्या कहाण्या वाचायला-ऐकायला मिळाल्या. उत्तरप्रदेशातील कानपूरमध्येही एक अनोखं लग्न पार पडलं.
2 / 7
इथे फुटपाथवर जेवण वाटताना एक तरूण भीक मागून खाणाऱ्या तरूणीच्या प्रेमात पडला आणि दोघांनी लग्नही केलं. या लग्नाला अनेक लोक उपस्थित होते आणि सोशल डिस्टंसिंगची काळजीही घेण्यात आली होती.
3 / 7
कुणाची वेळ कशी, कुठे बदलेल हे सांगता येत नाही. असंच काहीसं या भीक मागणाऱ्या तरूणीसोबत झालं. रस्त्यावर भिकाऱ्यांसोबतच बसणाऱ्या नीलमला एक तरूण रोज जेवण देत होता. (प्रातिनिधीक छायाचित्र) (साभार -.wur.nl)
4 / 7
नीलमला वडील नाहीत, आईला पॅरालिसिस झालाय. भाऊ आणि वहिणीने दोघींना मारझोड करून घरातून बाहेर काढले. नीलमकडे पोट भरण्यासाठी काहीही नव्हतं. त्यामुळे लॉकडाउनमध्ये जेवण मिळवण्यासाठी ती भिकाऱ्यांसोबत लाइनमध्ये बसत होती.
5 / 7
अनिल त्याच्या मालकासोबत रोज सर्वांना जेवण देण्यासाठी येत होता. दरम्यान अनिलला जेव्हा नीलमसोबत घडलेल्या गोष्टीची माहिती मिळाली त्याला फार वाईट वाटले. तो तिच्या प्रेमात पडला आणि नीलमला त्याने रस्त्यावरून काढून घरात जागा दिली.
6 / 7
अनिल एक प्रॉपर्टी डीलरकडे ड्रायव्हर आहे. त्याचं स्वत:चं घर आहे. माई-वडील, भाऊ असा परिवार आहे. नीलमला तर आशाही नव्हती की, कुणी तिच्याशी लग्न करेल. हे लग्न लावून देण्यासाठी अनिलचा मालक लालता प्रसाद यांचं सर्वात मोठं योगदान आहे.
7 / 7
अनिल जेव्हा दिवसा जेवण वाटून यायचा तेव्हा मालकासोबत नीलमबाबत बोलायचा. लालता यांनाही त्याच्या भावना कळाल्या. त्यानंतर लालता प्रसाद यांनी अनिलच्या वडिलांना या लग्नासाठी तयार केलं आणि एका विहारात दोघांचं लग्न लावून दिलं.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलUttar Pradeshउत्तर प्रदेश