जाणून घ्या, भारतीय चलनातील नोटांवर घडते ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 01:08 PM2019-12-10T13:08:57+5:302019-12-10T13:11:20+5:30

कोणार्क सूर्य मंदिर - रिझव्‍‌र्ह बँकेने जारी केलेल्या दहा रुपयांच्या नोटेवर कोणार्कचे सूर्यमंदिर दर्शविले आहे. ओडिशाच्या सुवर्ण त्रिकोणात येणारे हे सूर्य मंदिर तेराव्या शतकात नरसिंहराव प्रथमच्या काळात बांधले गेले होते. सूर्य मंदिराचे चाक या नोटेत दाखवले आहे.

वेळूर गुंफा - महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराजवळ अजिंठा-वेळूर लेणी आहेत. ही गुहा मोठे दगड तोडून तयार केल्या आहेत.

हम्पी रथ - हम्पीचा गरुड रथ हा पन्नास रुपयांच्या नोटांवर दाखविण्यात आला आहे. कर्नाटकातील तुंगभद्रा नदीच्या काठावर हंपी वसलेली आहे. हे द्रविड शैलीचे एक विशाल मंदिर आहे. ही मंदिरे चौदाव्या सोळाव्या शतकात विजयनगर साम्राज्याकडून बांधण्यात आलं होतं.

राणी की वाव - रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नवीन शंभर रुपयाच्या नोटेवर राणी की वाव दिसतो. वाव याला गुजराती भाषेत बावडी म्हणतात. ही राणी की वाव गुजरातमधील पाटण येथे आहे, जी अकराव्या शतकात राणी उदयमतीने बांधली होती.

सांची विहार - अलीकडेच, रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या दोनशे रूपयांच्या नोटमध्ये सांची नावाच्या बौद्ध विहाराचं चित्र बनविण्यात आलं आहे. मध्य प्रदेशातील हा विहार सम्राट अशोकाने बांधला होता. तोरण दरवाजे असे चार दरवाजे आहेत.

लाल किल्ला - नवीन 500 रुपयांच्या नोटांवर लाल किल्ला दाखविण्यात आला आहे. मोगलांनी जवळजवळ चारशे वर्षांपासून वसलेल्या या किल्ल्याला किला-ए-मुबारक असेही म्हटले जाते. लाल किल्ल्यात भारताच्या इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत.

मंगलयान - २ हजार रुपयांच्या नव्या नोटेवर मंगलयान चित्र दर्शविण्यात आलं आहे.

टॅग्स :भारतIndia