शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बांग्लादेश, श्रीलंकेहून जास्त लढाऊ विमानं 'या' माणसाकडे आहेत, F-16 विमानाचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 2:47 PM

1 / 9
जगात कोणत्याही देशाच्या शक्तीचा अंदाज घ्यायचा असेल तर त्यांच्याकडून वायू सेनेच्या शक्तीचा महत्वपूर्ण भूमिका असते. मात्र तुम्हाला माहिती आहे का की फ्रान्समधील एक माणूस असा आहे ज्याच्याकडे बांग्लादेश, श्रीलंकेपेक्षा अधिक लढाऊ विमानं आहेत.
2 / 9
फ्रान्सच्या बिओन टाऊनमध्ये राहणारे 87 वर्षीय मिशेल पोंट यांच्याकडे जगातील अनेक विमानांचा संग्रह आहे. ज्यात 110 लढाऊ विमाने आहेत. ग्लोबल फायर इंडेक्सनुसार बांग्लादेशाकडे 90 तर श्रीलंकेत 76 एअरक्राफ्ट आहेत ज्यात हेलिकॉप्टरचाही समावेश आहे.
3 / 9
मिशेल पोंट यांच्या विमानांच्या संग्रहात अलीकडेच अमेरिकेचे अत्याधुनिक एफ 16 या विमानाचा समावेश करण्यात आला आहे. ते जगातील एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे इतक्या मोठ्य़ा प्रमाणात विमानं आहेत.
4 / 9
मिशेल पोंट हे पेशाने पायलट होते. त्यांनी इतक्या मोठया संख्येने लढाऊ विमाने ठेवल्याने त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकोर्डमध्ये नोंदविण्यात आलं आहे. सध्या यातील कोणतंही विमान उड्डाण घेण्याच्या स्थितीत नाही.
5 / 9
या खासगी संग्रहालयाला भेट देण्यासाठी जवळपास 40 हजार पर्यटक दरवर्षी येतात. यातून होणाऱ्या कमाईवर ते नवीन लढाऊ विमाने खरेदी करतात.
6 / 9
विमानांचा संग्रह बनविण्याचे काम मिशेल पोंट यांनी 1980 पासून सुरू केलं. त्यांना पहिलं लढाऊ विमान लष्कराकडून बक्षिस म्हणून देण्यात आलं होतं.
7 / 9
विमानांचा संग्रह बनविण्याचे काम मिशेल पोंट यांनी 1980 पासून सुरू केलं. त्यांना पहिलं लढाऊ विमान लष्कराकडून बक्षिस म्हणून देण्यात आलं होतं.
8 / 9
विमानांचा संग्रह बनविण्याचे काम मिशेल पोंट यांनी 1980 पासून सुरू केलं. त्यांना पहिलं लढाऊ विमान लष्कराकडून बक्षिस म्हणून देण्यात आलं होतं.
9 / 9
विमानांचा संग्रह बनविण्याचे काम मिशेल पोंट यांनी 1980 पासून सुरू केलं. त्यांना पहिलं लढाऊ विमान लष्कराकडून बक्षिस म्हणून देण्यात आलं होतं.