शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आकर्षक मोठ्या डोळ्यांची चित्रकला पाहून व्हाल अवाक्, कशी काढली आहेत चित्र नक्की बघा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 2:52 PM

1 / 11
भोपाळमधील स्वराजविधी या आर्ट गॅलेरीत मंजुनाथ माने या चित्रकाराचे मानवी डोळे या थिमवर आधारीत असलेल्या चित्रकलेच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
2 / 11
मंजुनाथ माने यांच्या चित्रकलेच्या प्रदर्शनाची सुरूवात कर्नाटक येथून झाली.
3 / 11
कर्नाटक सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ कन्नड़ अॅण्ड कल्चर यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात मंजुनाथ माने यांची १२ चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती.
4 / 11
या प्रदर्शनातील एका चित्रात कर्नाटकच्या ग्रामीण भागातील लोकांची वेशभूषा, तसेच महिलांचे शृंगार करण्याच्या पारंपारीक पध्दती दिसून येतात.
5 / 11
दसरा असताना म्हैसूर मधील हम्पी मंदिरात जमलेले लोकं आणि त्यांचा उत्साह या चित्रातून दिसून येतो.
6 / 11
या सगळ्या चित्रांमध्ये वेगवगळ्या रंगांचा वापर केला आहे. पण या चित्रांमध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी आहेत ते म्हणजे चित्रात रेखाटलेल्या माणसांचे डोळे.
7 / 11
ही चित्र फारच मोठी आहेत, त्यात वेगवेगळे प्रसंग मांडले आहेत.
8 / 11
या चित्रांमधल्या मोठ्या डोळ्यांमागचे कारण सांगताना मंजुनाथ सांगतात की माझे स्वतःचे डोळे लहानपणापासूनच खूप मोठे आहेत.
9 / 11
लहानपणापासून मला प्रत्येक व्यक्ती माझ्या डोळ्यांबद्दल विचारत असत. असं मंजुनाथ चित्रांबद्दल बोलताना म्हणाले.
10 / 11
डोळे सुध्दा व्यक्तीमत्त्वातील महत्वाचा भाग असतो, काही प्रेमळ तर काही रागीट चित्र पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे डोळे मोठे रेखाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
11 / 11
चित्र पाहणाऱ्याचे व्हिजन हे मोठे असावे म्हणून त्यांनी मोठ्या डोळ्यांचे चित्र काढायचा संकल्प केला.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके