जगातले सर्वात शक्तीशाली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूटची किंमत माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 10:45 AM2020-02-25T10:45:52+5:302020-02-25T11:00:02+5:30

अमेरिकेत ट्रम्प यांना स्टायलिश आयकॉन मानलं जातं. ते जेवढे स्टायलिश राहतात तेवढं याआधी अमेरिकेच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षांना पाहण्यात आलं नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कपड्यांच्या किंमतीची काही महिन्यांपूर्वीच चांगलीच चर्चा रंगली होती. आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर आहे म्हटल्यावर त्यांच्याबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प भारतात पोहोचले तेव्हा ते नेव्ही ब्लू सूट आणि पिवळ्या रंगाचा टाय घालून होते. त्याची चर्चाही झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कपड्यांची नेहमची चर्चा होत असते. आज त्यांच्या कपड्यांची किंमत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ट्रम्प यांना अमेरिकेचे असे राष्ट्राध्यक्ष म्हटले जाते जे सर्वात महागडे आणि ब्रॅन्डेड सूट घालतात. त्यांचा सूटसाठी आवडता रंग नेव्ही ब्लू आहे. जास्तकरून ते लाल रंगाची टाय वापरतात. गेल्या १५ वर्षात अमेरिकेत त्यांना असंच बघण्यात आलंय.

ट्रम्प बऱ्याच वर्षांपासून इटलीतील जगभरात लोकप्रिय असलेल्या ब्रियोनीचे सूट वापरतात. असं असलं तरी त्यांना अनेकदा अरमानी आणि हूगो बॉसच्या सूटमध्येही बघण्यात आलंय. पण सामान्यपणे ब्रियोनीचेच कपडे वापरतात. जेव्हा विषय पॅंट आणि शर्टचा येतो तेव्हाही ते ब्रॅन्डेड कपडे पसंत करतात.

अमेरिकेत ट्रम्प यांना स्टायलिश आयकॉन मानलं जातं. ते जेवढे स्टायलिश राहतात तेवढं याआधी अमेरिकेच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षांना पाहण्यात आलं नाही. पण त्यांच्या कपड्यांवरून त्यांच्यावर टिकाही होत असते. अमेरिकेतील काही मॅगझिन त्यांना वेल्ड ड्रेस प्रेसिडेंट म्हणतात.

यात जराही शंका नाही की, ट्रम्प यांची एक वेगळी स्टाइल आहे. ते याच स्टाइलमध्ये नेहमी बघायला मिळतात. याचं कारण म्हणजे ते राष्ट्राध्यक्ष होण्याआधी अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवडत्या रंगांमध्ये निळा, लाल आणि पांढरा रंग आहे. त्यांचे कपडे जास्तकरून रंगीत असतात.

डोनाल्ड ट्रम्प इटलीच्या ज्या बियोनी ब्रॅन्डचे कपडे घालतात ती कंपनी ७५ वर्ष जुनी आहे. या कंपनीचा सर्वात महागडे कपडे विकणाऱ्या कंपन्यांमध्ये समावेश होतो. ही कंपनी खासकरून पुरूषांसाठी कपडे तयार करते. जगभरातील अनेक मुख्य शहरांमध्ये त्यांचे शोरूम्स आहेत.

बियोनीच्या सूटची किंमत ५ हजार डॉलर म्हणजेच ३.६ लाख रूपयांपासून सुरू होते आणि साधारण १७ हजार डॉलरपर्यंत असते. किंमत तुम्हाला सूट कसा हवा आहे आणि कापड कसा हवा आहे यावर ठरते.

अमेरिकेतील एका प्रसिद्ध वेबसाइटनुसार, डोनाल्ड ट्रम्प हे २००४ पासून ब्रियोनी कंपनीचे सूट वापरतात. निवडणुकीच्या काळात ट्रम्प हे नेहमीच बियोनीचे सूट घालून असायचे. आताही ते यांच कंपनीने सूट वापरतात.

आता ट्राऊजर्स आणि शर्टची किंमत किती असते हे जाणून घेऊ. ते यासाठी मार्टिन ग्रीनफिल्डच्या कपड्यांचा वापर करतात. माजी राष्ट्रपती ओबामा हे सुद्धा याच कंपनीने कपडे वापरायचे. यात लिनेन ट्राउजर्स आणि शर्टची जोडी साधारण ३०० डॉलर म्हणजे २१ हजार रूपयांपासून ते ६०० डॉलरपर्यंत मिळते.

डोनाल्ड ट्रम्प यांचे शूजही नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात. जे जगातला लोकप्रिय ब्रॅन्ड ऑक्सफोर्ड्सचे शूज वापरतात. यांची किंमत ४०० ते ६०० डॉलर(२८ हजार ते ४३ हजार रूपेय) इतकी असते. (Image Credit : footwearnews.com)