समुद्रात चक्क उभं होणारं एकुलतं एक असं जहाज, जे ट्रान्सफॉर्मरसारखं पूर्णपणे बदलतं....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 02:39 PM2020-04-03T14:39:42+5:302020-04-03T14:50:00+5:30

हॉलिवूडच्या 'ट्रान्सफॉर्मर' सिनेमातील कार्स कशाप्रकारे ट्रान्सफॉर्म होतात हे तुम्ही पाहिलं असेल, पण असं एक जहाज तुम्ही पाहिलं नसेल....

आतापर्यंत अनेक मोठे आणि अनोख्या जहाजांबाबत ऐकलं किंवा पाहिलं असेल. पण आज आम्ही आज तुम्हाला अमेरिकन नेव्हीच्या एका अनोख्या जहाजाबाबत सांगणार आहोत. या जहाजाबाबत वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल असंच हे जहाज आहे. हे जहाज खास यासाठी आहे कारण हे जहाज पाण्यात चक्क 90 डिग्री उभं राहू शकतं.

आतापर्यंत तुम्ही अनेक जहाजे पाण्यात आडवी पाहिली असतील. पण असं अनोखं जहाज नक्कीच पाहिलं नसेल. चला जाणून घेऊ या अनोख्या जहाजाबाबत...

हे चमचासारखं दिसणारं हे 355 फूट लांब जहाज यूएस नेव्हीचं सर्वात जुनं आणि सर्वात अजब जहाज आहे. या जहाजाचं नाव रिसर्च प्लॅटफॉर्म, फ्लोटिंग इंस्ट्रूमेंट प्लॅटफॉर्म (आरपी फ्लिप) आहे. आरपी फ्लिप एक रिसर्च व्हेइकल आहे. ज्याचा वापर समुद्री जीवांचं जीवन जाणून घेण्यासाठी, रिसर्चसाठी केला जातो.

हे जगातलं एकुलतं एक असं जहाज आहे जे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टली ऑपरेट केलं जाऊ शकतं. म्हणजेच उभं आणि आडवं ऑपरेट केलं जाऊ शकतं. केवळ 28 मिनिटात हे जहाज आपलं ट्रान्सफॉर्मेशनची प्रक्रिया पूर्ण करतं. याच्या हॅन्डलमध्ये 700 टन पाणी आणि क्रॅडलमध्ये एअर पंप केलं जातं आणि हे जहाज समुद्रात सरळ उभं राहतं.

355 फूट लांब जहाज सरळ उभं राहू शकतं. तेव्हा हे जहाज पाण्याच्या वर केवळ 55 फूट शिल्लक राहतं आणि बाकी 300 फूट जहाज हे पाण्याच्या आत राहतं. या जहाजावर 30 फूट उंच लाटांचाही काही प्रभाव होत नाही. महत्वाची बाब म्हणजे हे जहाज सरळ झाल्यावर अजिबात कमजोर होत नाही.

हे जहाज 1962 मध्ये व्हेव हाईट, अकाउस्टिक सिग्नल्स, वॉटर टेंपरेचरवर डेटा आणि रिसर्चच्या उद्देशाने सायटिस्ट डॉ. फ्रेड फिशर आणि डॉ. फ्रेड स्पाइसने विकसित केलं होतं. 1995 मध्ये या जहाजाचं मेकओव्हर करण्यात आलं होतं. ज्यासाठी 20 लाख डॉलर इतका खर्च आला होता.

या जहाजातील रूम्समध्ये प्रत्येक वस्तू डबल असते. बेड, गेट, सिंक, बेसिन सर्वकाही डबल असतं. जेणेकरून प्रत्येक स्थितीत यांचा वापर करता यावा. या जहाजावर ऑपरेशन दरम्यान 16 लोकांची टीम राहते. या जहाजावरून आतापर्यंत 300 पेक्षा जास्त यशस्वी ऑपरेशन करण्यात आले आहेत.

फ्लिपिंग प्रक्रियेदरम्यान क्रू चे सर्वच सदस्य बाहेरील डेकवर राहतात. बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भिंती फरशी आणि फरशी भिंती होतात. असं हे अनोखं जहाज आहे.