अजब आहे राव! चक्क 50 किलोचा साप आणि धारधार चाकूने होणार बॉडी-मसाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 12:00 IST2019-06-18T11:58:09+5:302019-06-18T12:00:44+5:30

आधुनिक जीवनात कामाचा वाढत्या दबावामुळे माणूस तणावाखाली राहतो. हा ताण घालविण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही. चीनमध्ये लोक कामाचा तणाव घालविण्यासाठी चाकूचा वापर करतात हे ऐकून तुम्हालाही नवल वाटेल.
चीनमध्ये महिला आणि पुरुष नव्हे तर चाकूच्या सहाय्याने लोकांना बॉडी-मसाज दिली जाते. या मसाजचे नाव आहे नाइफ मसाज
चाकूपासून करण्यात आलेल्या मसाजमुळे मांसपेशींना आराम मिळतो तर बुद्धीला शांती आणि तणावमुक्तीचा अनुभव प्राप्त होतो. मसाज देण्याआधी चाकूला धार दिली जाते. त्यानंतर माणसाच्या अंगावर आणि चेहऱ्यावर चाकूने मसाज दिला जातो.
चाकूच्या थेरपीमध्ये पहिल्यांदा शरीराला पातळ कपड्याने झाकलं जातं. त्यानंतर या कपड्यावरुन चाकूने मसाज केला जातो. या थेरपीसाठी विशेष चाकू बनविण्यात येतात त्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित आहेत.
चीनच्या या अजब थेरपीनंतर जपान आणि तायवानमध्ये नाइफ मसाजचा ट्रेंड सुरु झाला आहे. हा मसाज चक्क 50 किलोचा साप अंगावर टाकून साप हा मसाज करतो. हा साप माणसाच्या शरीरावर रेंगाळत असतो. त्याने हा मसाज होतो.
सापाच्या शरीराचं थंड तापमान आणि अधिक वजन हे दोन्ही मिळून माणसाचा तणाव कमी होण्यास मदत होते.